बोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

बोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे

 बोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे

संविरा शालेय वस्तू भांडार ज्ञानवंतांसाठी नवे क्षितिज निर्माण करेल- विक्रम पोकळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. ’विद्या विनयेन शोभते’... अशा प्रकारच्या अनेक शब्दांमध्ये सामर्थ्य असलेल्या म्हणी आपण गुणवत्ता आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने ऐकतो. सामाजिक बांधिलकी मानून आपल्या उद्योग क्षेत्राची योग्य आणि चांगलं क्षेत्र निवडून समाज उपयोगी कार्य करणारे माणसं नक्कीच आहेत. आष्टी शहरांमध्ये सातत्याने गुणवत्ता शिक्षण आणि संस्कार क्षेत्रांमध्ये सातत्याने रमून आपलं कर्तव्य निभावणारे बोडखे परिवार निश्चितच संस्मरणीय आणि लक्षात घेण्यासारखे कुटुंब आहे असं म्हणावं लागेल.
आष्टी शहरामध्ये नुकताच संविरा शालेय,शिक्षण साहित्य आणि वस्तू भांडारच्या रूपाने नुकताच मान्यवरांच्या शुभहस्ते त्याचा शुभारंभ झाला.शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांच्यासह जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस हे प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये संविरा शालेय वस्तू भांडाराचा शुभारंभ  झाला.कोरोनाविषयक नियम पाळून अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा ठरला.तसं पाहिलं तर बीड जिल्ह्याला मराठवाड्यामध्ये एक बुद्धीवंतांचा माहेरघर आणि संतांची भूमी म्हणून एक वेगळा नावलौकिक आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत आणि कर्तव्यदक्ष राजकीय,सामाजिक क्षेत्रामध्ये समाजधुरीण म्हणून ओळखल्या जाणार्या भूमीला एक वेगळे नावलौकिक प्राप्त झालेले आहे. बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील आष्टी शहराला राजकीय सामाजिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये वेगळेपण निर्माण झालेले आहे. बीड जिल्ह्यामधील पत्रकारीता क्षेत्रामध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने वैभव निर्माण करून दिलेल्या जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी अनेक राजकीय,सामाजिक आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक माणसं घडवण्याचा वास्तव इतिहास रचला आहे. त्यांच्याच परिवारामध्ये संविराचा या शालेय क्षेत्रांमध्ये अत्यंत कमीत कमी किमतीमध्ये वस्तू.. उदाहरणार्थ वह्या पुस्तके एमपीएससीसाठी लागणारी विविध प्रकारची पुस्तके, ग्रंथ, अत्यंत वास्तव आणि कमी किंमतीमध्ये देण्याचा माणसं मनामध्ये ठेवून सद्यस्थितीमध्ये बेरोजगारांसाठी अशास्थान निर्माण करणारे केंद्र ठरेल असा विश्वास या शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच नामदेव राऊत यांनी व्यक्त केला आहे.  
उदघाटन प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस,माजी शिक्षणाधिकारी पोकळे,नामदेव राऊत,गणेश दळवी,उत्तम बोडखे,प्रवीण पोकळे,शरद तळेकर,पोपट घुले सर,.नवनाथ विधाते,वसंत चव्हाण ,वामनराव निकाळजे, राजेंद्र खेडकर,विशाला चव्हाण, स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था सचिव गहिनीनाथ तोतरे, केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे, केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बहिर प्रदीप,डोईठाण के.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक दहातोंडे ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक सचिन वारंगुळे आदी उपस्थित होते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत बिंबवल्यामुळे आज प्रचंड क्रांती गोरगरिबांच्या झोपडीमध्ये झालेली आपण पाहतो.गोरगरीब दीनदलित दुबळ्या अपंग वंचित घटकांना शिक्षणाचा आधार देऊ शकते किंबहुना शिक्षणातूनच माणूस स्वावलंबी बनू शकतो ही विचारधारा आज सर्वांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.आष्टीसारख्या एकेकाळच्या अविकसित,ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली दिसून येत आहे.अनेक जण मोठमोठ्या पदावर कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांमध्ये बरीच मुलं अभ्यासाच्या माध्यमातून नशीब आजमावत आहेत. माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून कृषी आरोग्य शिक्षण पोलीस विभाग आदि सर्व विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत अशा स्थितीत या युवकांसाठी कमीत कमी किमतीमध्ये वह्या पुस्तके ग्रंथ स्पर्धापरीक्षांची विविध पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून संविरा या शालेय वस्तू भांडारच्या रूपातून बोडखे परिवाराने टाकलेले पाऊल निश्चितच आष्टी करण्यासाठी यशस्वी आणि उज्ज्वल पाऊल ठरेल असा विश्वास आष्टीकरांना वाटतो.

No comments:

Post a Comment