दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महिला शिक्षिका’ पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महिला शिक्षिका’ पुरस्कार

 दिपाली पुराणिक यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महिला शिक्षिका’ पुरस्कार

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिरेगाव (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती दिपाली राजेंद्र पुराणिक यांना सरपंच सेवा महासंघ (निशिक विभाग)चा राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे.
सरपंच सेवा महासंघ महाराष्टातील शैक्षणिक, सामाजिक, राजकिय, क्रिडा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या आदर्श व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2021 चा राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक पुरस्कार दिपाली राजेंद्र पुराणिक यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण 9 ऑगस्ट 2021 रोजी कोल्हापूर येथील नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर कलादालन येथे होणार असल्याची माहिती सरपंच सेवा संघा
चे राज्य सरचिटणिस बाबासाहेब पावसे यांनी दिली. श्रीमती पुराणिक यांनी शेक्षणिक क्षेत्रात काम करतानाच आपल्या कार्य क्षेत्रातील, सर्वसामान्य माणसांना माणुसकीच्या नात्याचा हात पुढे करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच आदिवासी, कष्टकरी, पिडीत महिलांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थांना ब्रेल लिपीचे महत्वासह ब्रेल लिपीत शिक्षण घेणार्या  दिव्यांग विद्यार्थांसाठी रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन अशा कार्यात सतत योगदान देत असतात. शासनाने ऑनलाईन आभ्यासक्रम जाहीर करण्याच्या आधापासून ग्रामीण भागातील विद्यार्थांना संगणक, लॅपटॉप, मोबाईलचा वापर याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here