बालवाडी ते उच्च शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले- राम पानमळकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 15, 2021

बालवाडी ते उच्च शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले- राम पानमळकर

 बालवाडी ते उच्च शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले- राम पानमळकर

अब्दुस सलाम सर यांचा पी.एचडी.बद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अलफलाह एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहून कुटूंबाचा आधार बनत आहेत. सर्वसामान्या घरातील मुलांना शिक्षण मिळवे यासाठी बालवाडीपासून ते उच्च शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले आहे. वंचित घटकांसाठी त्यांची शिक्षण विषयीची तळमळ सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या कार्याचा लौकीक सर्वदूर झाला आहे. त्याचे हे निरंतर सुरु असलेल्या कार्यामुळे त्यांना पी.एच.डी.ही प्राप्त झाल्याचा सर्वांनाच अभिमान आहे, असे प्रतिपादन नागरदेवळे ग्रामपंचायतीचे सरपंच राम पानमळकर यांनी केले.
अलफलाह एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीचे सेक्रेटरी डॉ.शेख अब्दुस सलाम सर यांना पी.एच.डी मिळाल्याबद्दल नागरदेवळे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच राम पानमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे, ग्रा.पं.सदस्य फैरोज पठाण, अय्युब पठाण, मयुर पाखरे, सोनू भुजबळ, अजय गारदे, आशिष बोंदर्डे, सदस्य शौकत अली, माजी ग्रामपंचायत सदस्य अफरोज शेख, सय्यद मुजाहिद, जावेद शेख, शेख गुलाम दस्तगीर, शेख इम्रान, शेख शाकीर, मोमीन अमजद, खान मोहसीन, शेख जाबीर आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना सलामसर म्हणाले, सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना शिक्षण मिळावे, या हेतूने शिक्षण संस्थेची सुरुवात करुन या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्वसामान्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे. या कार्यात अनेकांचे सहकार्य मिळत गेले आणि एक-एक वर्ग वाढत गेले. यामध्ये गावकर्यांचेही मोठे सहकार्य आहे. आजच्या सत्कारामुळे यापुढेही आपणास काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शेख जमीर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन खान निशांत बाजी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सय्यद अफसाना यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here