प्रहार संघटना कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभी ः अ‍ॅड. पोकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

प्रहार संघटना कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभी ः अ‍ॅड. पोकळे

 प्रहार संघटना कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभी ः अ‍ॅड. पोकळे

संघटनेच्यावतीने बाळासाहेब ढगे यांच्या वारसांना मदतीचा धनादेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ना.बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग संघटना काम करत आहेत. दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी झटून काम करत आहेत. कोरोना काळातही दिव्यांच्या मदतीसाठी हे पदाधिकारी काम करत होते. पारनेरमध्ये असेच कार्य करत असतांना तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढगे यांचे निधन झाले. हा संघटनेसाठी मोठा धक्काच होता. स्व.बाळासाहेब ढगे यांनी कोणतेही कामात माघार घेतली नाही. पारनेर तालुक्यातील दिव्यांगांसाठी खूप चांगले काम त्यांनी ना.बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली केले. महाराष्ट्रात सर्व आंदोलनात सहभाग असायचा. आज ते आपल्या नसले तरी त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवून त्यांच्या कुटूंबीयांना सर्वोतोपरि मदत केली जाईल. प्रत्येक परिस्थिती पहार संघटना कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिल, असे प्रतिपादन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे यांनी केले.
दोन महिन्यापूर्वी  कोरोनाच्या महामारीत अल्पशा आजाराने  पारनेर तालुका प्रहारचे अध्यक्ष बाळासाहेब ढगे यांचे निधन झाले.  संघटनेच्यावतीने वारसदार श्रीमती उषाताई ढगे यांना आर्थिक मदत म्हणून रु.25,000 फिक्स डिपॉझिट पावती देण्यात आली.  याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटना राज्य अध्यक्ष बापूराव काणे व जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, उपाध्यक्ष दत्ता महानोर,  सचिव हमीद शेख, समन्वयक राजेंद्र पोकळे, किशोर सुर्यवंशी, उपाध्यक्षा निर्मला भालेकर, नगर तालुका उपाध्यक्ष संदेश रपारिया, नूतन पारनेर तालुका अध्यक्ष अरविंद नरसाळे, उमेश पवार, सागर सातपुते, नारायण काणे, विश्वास माने, सौ.कांता सरडे, भीमा शिर्के, संजीवनी पवार, अरुण गवळी आदि उपस्थित होते.
राज्याध्यक्ष बापूराव काणे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील कर्तबगार प्रहारचा हिरा हरपला त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत लागली तर संघटना कधीही मागे हटणार नाही. तालुक्यातील कोणत्याही पदाधिकार्यांना काही अडचण असेल त्यांची अडचण सोडवली जाईल, असे सांगून  स्व.ढगे यांच्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला.
राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे  प्रास्ताविकात म्हणाले, ज्या प्रहार च्या कार्यकर्त्याने आपले बरासा काळ दिव्यांगांसाठी घातला दिव्यांगांची सेवा केली त्यांना प्रहार संघटना कधीही विसरणार नाही. स्व.ढगे यांच्यासारखेच काम पारनेर तालुक्यातील चालू ठेवण्याची गरज आहे, तीच खरी श्रध्दांजली ठरेल.
कै. बाळासाहेब ढगे यांच्या मागे दोन मुले आहेत त्याच्या  शिक्षण चालू आहे.  यावेळी कै बाळासाहेब ढगे यांच्या नावाने एक आंब्याचे झाड लावण्यात आले.  पारनेर  तालुका प्रहार संघटनेच्यावतीने सर्वांचे  मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment