सन्मान प्रामाणिक कोरोना योध्द्याचा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

सन्मान प्रामाणिक कोरोना योध्द्याचा..

 सन्मान प्रामाणिक  कोरोना योध्द्याचा..

मनसेवतीने पोस्टातील स्टाफ कर्मचार्‍यांचा सन्मान
तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः महाराष्ट्र नवनिर्मिन सेनेच्या वतीने सुपा पोस्टमन बोरुडे  यांचा सन्मान करण्यात आला कोरोना काळात सुद्धा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पञ देण्यासाठी ज्या वेळी लोक नविन वस्तू असो की कागद सोडा पैशाला हात लावायला सुद्धा घाबरत होती तेव्हा सुद्धा बोरुडे मामा पोस्टातुन आलेले टपाल असो की पञ देण्यासाठी फोन करून घरोघरी जाऊन आपली सेवा जिम्मेदारी कर्तव्य करत होते याच कामाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्मिन सेना पारनेर तालुक्याच्या वतीने सर्व पोस्टातील स्टाप व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी सुद्धा बोरुडे मामा पोस्टात नव्हते तर आपलं कर्तव्य करण्यात व्यस्त होत आज एक पञ देण्यासाठी माझ्याकडे आले असता मी विचारले काय म्हणता मग मामा तब्बेत वगैरे ठीक आहे नः तर मामाचे उत्तर आपण आपल्या कामामुळे व्यस्त आहे प्रामाणिक काम करत आहे त्यामुळे अजुन तरी एकदम ठणठणीत आहे व देवाचे अस्तित्व नक्कीच आहे मी माळकरी माणुस त्यामुळे कसलीही कोरोणाची  भिती वाटत नाही खरच सलाम करावासा वाटतो यांच्या विचारांना व कार्याला महाराष्ट्र नवनिर्मिन सेना पारनेर अशाच प्रामाणिक माणसासोबत सदैव असुन त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नेहमीच तत्परतेने पुढे असते बोरुडे मामांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या  यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here