जामखेड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ईकडे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

जामखेड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ईकडे यांची निवड

 जामखेड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ईकडे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  दि. 7 जूलै रोजी जामखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड शाखेची बैठक पार पडली यावेळी उपस्थित सभासदांमधून तालुकाध्यक्ष म्हणून शिवाजी ईकडे यांची बिनविरोध करण्यात आली. संघटनेचे मावळते अध्यक्ष वसंत सानप यांनी आपला पदभार सन्मानपूर्वक ईकडे यांच्याकडे सोपवला.
यावेळी  जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे व लियाकत शेख , ओंकार दळवी, संजय वारभोग, फायक अली सय्यद, दत्तात्रय राऊत, रिझवान शेख, पप्पूभाई सय्यद, गणेश जेवरे, अनिल धोत्रे, रामाहरी रोडे, मनोज कोळपकर आदी पत्रकार उपस्थित होते. तालुकाध्यक्ष शिवाजी इकडे यांनी सर्वांचे आभार मानले व सहकार्य करावे असे आवाहन केले.
या निवडीबद्दल शिवाजी ईकडे यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here