राहुरी तालुक्यातील कोरोना आटोक्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

राहुरी तालुक्यातील कोरोना आटोक्यात.

 राहुरी तालुक्यातील कोरोना आटोक्यात.

राज्यमंत्री तनपुरेंनी घेतला आढावा..

राहुरी - राहुरी तालुक्यातील सुमारे 50 गावांत गेल्या सात दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही ही महत्वपूर्ण माहिती आज झालेल्या लसीकरण व कोरोना विषयी राज्यमंत्री तनपुरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान स्पष्ट झाली.
कोरोना आटोक्यात येत असताना लसीकरणाचे अधिक सुक्ष्म, गावनिहाय नियोजन करून गर्दी गडबड होऊ नये यासाठी आपण केलेल्या पूर्वीच्या नियोजनानुसार यादीनुसार अनुक्रमे लसीकरण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग कमी असल्याचे निर्देशनास आले त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले. बैठकीसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, पी.आय. आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here