अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही...

 अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही...

भेसळयुक्त दूध जप्त.


जामखेड -
दुधात भेसळ करून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्रातील 2 लाख 29 हजार 419 रुपयांचे 8 हजार 497 लिटर भेसळयुक्त गाईचे दूध पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त करून बारामती नगर परिषदेच्या मैदानावर ओतून दिले आहे या कारवाईने दुधाचा गोरख धंदा करण्याचे धाबे दणाणले आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की, जामखेड येथून टॅँकर (एम.एच 11/ए.एल 5962) मधून सुमारे 8 हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. परिमंडळ 5 चे सहायक आयुक्त (अन्न) अर्जुन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश, बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन छापा टाकून कारवाई केली. टॅँकरचालक संपत भगवान ननावरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवकृपा दूध संकलन केंद्राचे असल्याचे सांगितले. पथकातील अधिकार्‍यांनी दुधाची तपासणी केली. तेव्हा भेसळयुक्त तसेच कमी दर्जार्चे असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित 2 लाख 29 हजार 419 रूपयांचे 8 हजार 497 लिटरचा साठा जप्त केला आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या मैदानावर नष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here