भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आ.राम सातपुते यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आ.राम सातपुते यांची नियुक्ती

 भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आ.राम सातपुते यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटकचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
बुधवार, 14 जुलै रोजी ही घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सहमतीने भाजपाच्या युवक आघाडीची अर्थात भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, तीन राष्ट्रीय महामंत्री, तर सात राष्ट्रीय सचिव यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी, मीडिया प्रभारी, सोशल मीडिया प्रभारी, तसेच पॉलिसी रिसर्च, या पदांवर प्रत्येकी एका व्यक्तीची नियुक्ती केली गेली आहे.

No comments:

Post a Comment