गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण

 गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  पनघट प्रॉडक्शन निर्मित गीतकार सूर्यकांत भालेराव लिखित  नेवासे येथील गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी येणार्‍या आषाढी एकादशीचे औचित्य साधून गायलेले व नायिका म्हणून ही चित्रित केलेले आले पांडुरंगा देवाहे व्हिडिओ  भक्तीगीताचे लोकार्पण येथील प्रसिद्ध डॉक्टर गिताराम कुलकर्णी यांच्या हस्ते लॅपटॉपवरील कळ दाबून करण्यात आले.
या व्हिडिओ भक्तीगीताला प्रसिध्द संगीतकार अतुल दिवे यांनी संगीत दिले आहे.तर अनिकेत हरेर यांनी दिग्दर्शन केले आहे.डॉ.कुलकर्णी यांच्या निवासस्थानी झालेल्या लोकार्पण प्रसंगी डॉ.गीताराम कुलकर्णी समवेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त रामभाऊ जगताप, गीतकार सीआयडी विभागातील माजी अधिकारी नेवासा येथीलसूर्यकांत भालेराव, गायिका सौ.माधुरी कुलकर्णी,पनघट प्रॉडक्शनच्या निर्मात्या प्रा.सौ. मंदाकिनी थावरे(भालेराव)नितीन कुलकर्णी, पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार शंकर नाबदे,अभिषेक गाडेकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गीतकार सूर्यकांत भालेराव म्हणाले की माझ्या गितरचनेचे आले पांडुरंगा  देवाहे सहावे भक्तिगीत असून पनघट प्रोडक्शन्स यू ट्यूब चॅनल तर्फे पंढरीचे पांडुरंग चरणी ते अर्पण केलेले आहे  हे भक्तीगीत सर्व भाविक भक्तांसाठी सादर करताना खूप आनंद होत आहे. रसिकांचे उदंड प्रेमळ प्रतिसादाने आम्हास नवीन नवीन गाणी सादर करण्यास अमोल अशी प्रेरणा मिळत राहील त्यामुळे आपणास जास्तीत जास्त चांगली गाणी देण्याची जबाबदारी वाढत राहील आपल्या आशिर्वादाने ही जबाबदारी नक्कीच पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गायिका सौ.माधुरी कुलकर्णी म्हणाल्या की नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व विठ्ठल रुख्मिनी मंदिर येथे या भक्तिगीतासाठी चित्रीकरण करण्यात आले.औरंगाबाद येथील ए एम डी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गाणे तयार करण्यात आले.स्वाती कुलकर्णी यांनी संकलन केले. मी प्रथमच गायिका व नायिका बनून हे व्हिडिओ चित्रित भक्ती गीत  पांडुरंगाच्या चरणी सादर केलेले आहे ते गीत गोड मानून घ्यावे अशी विनंती करत त्यांनी आपले अभिप्राय रूपी आशिर्वाद यू ट्यूब चॅनल मधुन द्यावेत असे आवाहन यावेळी बोलतांना केले.

No comments:

Post a Comment