नेवासा तालुक्याचा सर्वांगिण विकासाठी ना. गडाख कटीबध्द ः सौ. गडाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

नेवासा तालुक्याचा सर्वांगिण विकासाठी ना. गडाख कटीबध्द ः सौ. गडाख

 नेवासा तालुक्याचा सर्वांगिण विकासाठी ना. गडाख  कटीबध्द ः सौ. गडाख

मांडेगव्हाण, मोरगव्हाणमध्ये सुमारे पन्नास लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील मांडेगव्हाण व मोरगव्हाण या गावांमध्ये मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख व सौ सविताताई अनिलराव अडसुरे जिल्हा परिषद चांदा गट यांच्या निधीतून मंजूर  विविध विकास कामांचे भूमिपूजन पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई गडाख यांच्या हस्ते गुरुवार दि.15 जुलै रोजी विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यामध्ये मांडेगव्हाण येथील शिंदे वस्ती रस्ता खडीकरण करणे , मांडेगव्हाण गावात प्राथमिक शाळा खोली बांधकाम करणे , मोरगव्हाण येथे नवीन कूपनलिका घेणे व इलेक्टरीक मोटर बसवणे , मोरगव्हाण येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे या सुमारे 50 लक्ष रुपये किंमतीच्या विविध लोकउपयोगी कामांचा समावेश आहे.
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे हे तालुक्यातील पहिलेच काम असून ना.शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे. या वेळी बोलताना सौ सुनीताताई गडाख म्हणाल्या की मांडेगव्हाण मोरगव्हाण ही गावे मा खा यशवंतरावजी गडाख व ना शंकरराव गडाख  लाडकी गावे आहेत,या गावांनी संपूर्ण गडाख कुटुंबावर नेहमी खुप प्रेम केले आहे.जिराईत पट्यातील या गावांना ना गडाख विविध कामांसाठी नेहमीच प्राधान्य देतात.प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील विविध गावांना 38 जिम दिल्या असून त्यातील 1 जिम मांडेगव्हाण ,मोरगव्हाण या गावात मंजूर झाली आहे ती लवकरच कार्यन्वित होणार आहे.पंचायत समितीच्या माध्यमातून गावात 10 लाखांची कामे सुरू होत आहेत .
नेवासा तालुक्यात विविध  रस्त्यांचे नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.कामे गुणवत्तापूर्ण होण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.पंचायत समितीच्या माध्यमातून गाय गोठा, शेळी गोठा ,अल्पभूधारकाचे प्रस्ताव ग्रामपंचायत व ग्रामसेवकाकडे सादर करण्याचे व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सौ सुनीताताई गडाख यांनी केले.तसेच मांडेगव्हाण,मोरगव्हाण या गावाची कृषी विभागाच्या विविध योजनांची अमंलबजावणी  करण्यासाठी राष्ट्रीय कोरडवाहू अभियानातून निवड करण्यात आलेली आहे त्यामाध्यमातूनही  गावात विविध कृषी विषयक योजना राबविण्यात येतील व त्यातून शेतकरी बांधवाना शेती करतांना हातभार  लागेल माहिती सौ गडाख यांनी दिली
नेवासा पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांनी पंचायत समितीच्या सुरू असलेल्या कामांची व विविध योजनांची माहिती दिली यावेळी उपसभापती किशोर जोजार,पं.स.सदस्य बाळासाहेब सोनवणे,अनिल अडसुरे,पंचायत समितीचे सभापती कारभारी जावळे,सरपंच अमोल जाधव,बाबुराव चौधरी, प्रकाश भालके, सरपंच धनंजय वाघ,संदीप येळवंडे, पत्रकार अरुण सोनकर,भानुदास सोनवणे,आप्पासाहेब शिंदे, बबनराव बाराहाते,सरपंच लक्ष्मण घुले, बलभीम काळे, मारुती जगदाळे,एकनाथ जाधव बाबासाहेब सोनवणे,अजिनाथ जगदाळे, सर्जेराव धंदक,भीमराव सोनवणे ,देविदास उदमले,पाटीलबा जाधव,लक्ष्मण गाढे,सूर्यभान बर्डे,ज्ञानदेव धंदक, सरपंच अंबादास आव्हाड,पोपट माळी, भारत पालवे,महादेव पालवे,राजेंद्र पालवे, मच्छिंद्र घुले,गोरक्षनाथ सोनवणे,ग्रा.पं. सदस्य दिलीप सोनवणे,उपसरपंच सुरेश सुरुसे,अंकुश धंदक, महेशराव काकडे,दिलीपराव सोनवणे,सौ.ताराबाई येळवंडे, सौ.चंद्रकला कानिफ सोनवणे,सौ.शोभा विक्रम चौधरी, आदिसह ग्रामस्थांसह शेखर शेलार गटविकास अधिकारी,संजय खेले जीप शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता विजय बोदार्डे ,रुपनर उपअभियंता लघु पा, कराळे शाखा अभियंता लघु पा, हारदे भाऊसाहेब ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment