नव्या पिढीने चांगल्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीच्या उत्कर्षासाठी करावा ः डॉ. घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

नव्या पिढीने चांगल्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीच्या उत्कर्षासाठी करावा ः डॉ. घुले

 नव्या पिढीने चांगल्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीच्या उत्कर्षासाठी करावा ः डॉ. घुले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः आज 80 टक्के व्यवसाय हे शेतीशी निगडित आहे त्यामुळे  शेतीच्या उत्कर्षासाठी सर्वांनी एकत्रित येऊन  काम करणे आवश्यक असून नव्या पिढीने चांगल्या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी अवलंब करावा असे आवाहन डॉ.क्षितिजभैय्या घुले पाटील यांनी नेवासा येथील ऍग्रोवन मार्ट दालनाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक,माजी आमदार पांडुरंग अभंग, अँड.देसाई देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,ज्ञानेश्वरचे संचालक काशिनाथ नवले, शेतकरी नेते अंबादास कोरडे,पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, बबनराव भुसारी,मुळाचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले, मार्केट कमिटीचे अध्यक्ष डॉ.शिवाजी शिंदे, नगराध्यक्ष सतीश पिंपळे,उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, दादासाहेब गंडाळ,अंबादास कळमकर,संतोष काळे,गंगाधर कानडे, दिगंबर शिंदे, प्रगतशील शेतकरी माऊली पवार,डॉ. भारत कर्डक,ज्ञानेश्वरचे एम डी कोलते,अनिल हापसे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रम संयोजक प्रमोद शिंदे,अँड.बाळासाहेब शिंदे,भास्करराव शिंदे, डॉ.शंकर शिंदे यांनी स्वागत केले.काकासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक करतांना नवीन तंत्रज्ञान विषयी माहिती उपस्थितांना दिली.उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानानुसार तयार करण्यात आलेल्या विविध अवजारांची माहिती घेतली.
यावेळी बोलताना हरिभक्त परायण गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आज पुढे येत आहे त्यामुळे विकासाचे पाऊल पुढे पडत आहे,जिथे सहकाराची मंदिरे टिकली तेथे आरोग्यसह शेतीही वैभवशाली बनली आहे स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील व जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख साहेबांनी ही किमया करून दाखवली आहे.त्यामुळे नव्या पिढीने चांगल्याचे मार्गदर्शन
वाडवडिलांचा आदर्श  घेऊन जीवन घडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी शेतीविषयक मार्गदर्शन करत नव्या पिढीला उच्च तंत्रज्ञानाची कास धरून शेती व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजूबाबा गायकवाड यांनी केले तर प्रा.रमेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार,पुरुषोत्तम सर्जे,भाऊसाहेब मोटे, शंकरराव लोखंडे, डॉ.कौशिक,समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,महेश मापारी,रामकिसन जाधव,अँड.मारुतराव कर्डक,पी.आर.जाधव, मुकींदपुरचे सरपंच सतीश निपुंगे,गफूरभाई बागवान,अँड. अण्णासाहेब अंबाडे,नारायण लोखंडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment