राज्यातील तिघाडी सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ शिर्डी भाजपाचे निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

राज्यातील तिघाडी सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ शिर्डी भाजपाचे निवेदन

 राज्यातील तिघाडी सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ शिर्डी भाजपाचे निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्यावतीने सोमवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शिर्डी यांना वाढीव वीज बिल आणि थकीत वीज कनेक्शन तोडू नये या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टी शिर्डीच्यावतीने विज वितरण कंपनीला सोमवार दि. 12 जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी नरेश सुराणा, सोमराज कावळे, राजेंद्र गोंदकर, भाऊ भोसले, जयंती पटेल, बाळासाहेब ओस्तवाल, दादा काळे, सुधीर शिंदे, राहुल घुले, पंडित गुडे, संपत जाधव, रमेशजी बिड़ये, दत्तू गोंदकर, बापू ठाकरे, अरुण सहारे, रावसाहेब शेळके, सचिन तनपुरे, साईराज कोते, अर्जुन जगताप तसेच शिर्डी शहरातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment