सोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 21, 2021

सोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार.

 सोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार.


श्रीरामपूर -
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात दरोडेखोरांनी माजी वनाधिकारी सुरेश दौंड निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली.
घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच अहमदनगर येथील एलसीबी पथक पाचारण करण्यात आले होते. सदर दरोडेखोरास तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे करत आहेत.
वनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांनी घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोनवरून कळविली. परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला असता ते फरार झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here