फेज 2 अमृत योजना कामांची महापौरांकडून पाहणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 21, 2021

फेज 2 अमृत योजना कामांची महापौरांकडून पाहणी.

 फेज 2 अमृत योजना कामांची महापौरांकडून पाहणी.

कामे त्वरित पूर्ण करण्याचे दिले आदेश...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुळा व विळद येथील पंपीगसाठी असणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांची बैठक घेणार असून देहरे येथील रेल्वे क्रॉसिगंचे काम करून पाईप लाईन टाकण्यासाठी बोगदा खोदण्याचे काम जवळपास 70 मीटरचे असून आतापर्यत 15 मीटरचे काम झाले हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी सूचना महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केली आहे.
मा.केंद्र शासनाच्या अमृत योजनेचे पाणी पुरवठा विषयक कामाची पाहणी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी पदाधिकारी व अधिकारी यांचे समवेत केली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
महापौर यांनी अमृत पाणी पुरवठा योजना मुळा नगर ते विळद ते वसंत टेकडी पर्यत सुरू असलेल्या पाईप लाईन टाकण्याच्या कामाची माहिती घेतली. व प्रत्यक्ष पाहणी केली.  मुळा नगर येथील पंपीग मशिनरी बाबत माहिती घेतली विळद येथील फिल्ट्रेशन प्लॅट ,संपवेल, तसेच, आदी कामे प्रगती पथावर आहेत. त्याची देखील पाहणी केली.  अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजना वरील विळद जलशुध्दीकरण केंद्र येथे उच्च दाब कनेक्शन मधील कनेकटेड लोड वाढविणे आवश्यक असून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. सदरचा कनेकटेड लोड वाढविल्यास  मुळा नगर, विळद पंपीग स्टेशन करिता आवश्यक आहे. पाण्याची लाईन दोन ते तीन शेतकर्‍यांच्या अडचणी असून त्याबाबत चर्चा करून त्या सोडविण्यात येतील; असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी सांगितले की, अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम किती दिवसा पासून सुरू आहे आतापर्यत काम किती पूर्ण झाले याची माहिती घेतली. पाईप लाईन टाकण्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे जेणे करून शहरातील नागरिक व उपनगरातील नागरिकांची पाणी समस्या लवकरात लवकर मार्गी लागेल.
यावेळी आयुक्त मा.श्री.शंकर गोरे, उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले, नगरसेवक मा.श्री.अनिल शिंदे, मा.श्री.गणेश कवडे, मा.श्री.शाम नळकांडे, मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.प्रशांत गायकवाड, माजी शहर प्रमुख मा.श्री.संभाजी कदम, माजी उपमहापौर मा.श्री.अनिल बोरूडे, माजी नगरसेवक मा.श्री.संजय शेंडगे, मा.श्री.संतोष गेणाप्पा  मा.श्री.बबलू शिंदे, जलअभियंता श्री.परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख  श्री.आर.जी;सातपुते, मजिप्रा चे कार्यकारी अभियंता श्री.वाईकर, उपअभियंता श्री.मुळे, मेकॅनिकल इंजि. श्री.दिवाल, श्री.राजेश लयचेट्टी, श्री.किशोर कानडे, श्री.राजू नराल,  शोनन इंजिनिअरींग वर्क चे श्री.पानसे,  तापी कंपनीचे रितेश आगरवाल, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment