शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे- उपमहापौर गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे- उपमहापौर गणेश भोसले

 शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे- उपमहापौर गणेश भोसले

विनायकनगर येथील अभिनव कॉलनीत वृक्षरोपण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे. प्रत्येक प्रभाग हिरवाईने नटल्यास शहर हरित होणार असून, शहराची सुंदरता वाढणार आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा ऑक्सिजन अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज सर्वांना पटली. मात्र ऑक्सिजन देणारे झाडे लावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पुढाकार घेत नाही. निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी वृक्षाची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
विनायकनगर येथील अभिनव कॉलनीत ओपन स्पेसवर उपमहापौर भोसले यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय चोपडा, संतोष गुगळे, शैलेश गुंदेचा, आशिष पिपाडा, मुकुंद निकुंभ, जयकीसन दायमा, प्रशांत भंडारी, नन्नवरे मॅडम, रेश्मा गुगळे, मेघना पिपाडा, निकुंभ मॅडम, खोलम आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.पुढे उपमहापौर भोसले म्हणाले की, नकारात्मक विचार सोडून नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रभागासह शहराचा विकास साधला जाणार आहे. चांगली भावना ठेऊन विकासात्मक दृष्टीने प्रभागात काम केल्याने मागील पंचवीस वर्षापासून नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. प्रभागाचे नियोजन करुन प्रश्न सोडविल्यास इतर प्रभागासह शहर झपाट्याने बदलेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी मनोगत व्यक्त करुन भोसले यांच्या नियोजनबध्द कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अभय मुथ्था यांनी केले. आभार आशिष पिपाडा यांनी मानले.

No comments:

Post a Comment