साईनगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

साईनगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

 साईनगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः शिर्डी येथे 15 जुलै रोजी साईनाथ रक्तपेढी रक्तदान शिबिराचे साई संस्थान ब्लड बँक शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. साईबाबांच्या नगरीत दुसर्‍या शिबीरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोन्ही शिबीरात एकुण 104 रक्तदात्यांनी रक्तदान करून साईबाबांच्या रूग्णसेवेच्या कार्यात योगदान दिले. लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमीत्ताने साईनगरीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात साईबाबा संस्थान, पोलीस उपअधिक्षक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (शिर्डी विमानतळ), श्रीराम प्रतिष्ठाण, श्रीरामनगर, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, वाहतुक शाखेचे निरीक्षक नारायण न्याहाळदे, शिर्डी विमानतळावरील सीआयएसएफचे उपकमांडट दिनेश दहीवाडकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड, साईमंदीर सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी, उपनिरीक्षक अशोक लाड, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोंदकर, राम पवार, भारतीय जैन संघटनेचे नरेश पारख, कमलेश लोढा, निलेश गंगवाल, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, राजेंद्र गोंदकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके आदींनी रक्तदान घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे व साईमंदीर प्रमुख रमेशराव चौधरी यांनी रक्तदान करून शिबीराचा श्रीगणेशा केला. यावेळी प्रांताधिकारी शिंदे, तहसिलदार हिरे, रक्तपेढीच्या डॉ. मैथिली पितांबरे यांची उपस्थित होती.

No comments:

Post a Comment