छावा संघटनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

छावा संघटनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड

 छावा संघटनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण पुढील दिशा व अखिल भारतीय छावा संघटना अहमदनगर जिल्हा आढावा बैठक पार पडली या बैठकीत नगर तालुका अध्यक्ष पदी किरण फटांगरे यांची निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी विजय धाडगे, भीमराव मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हा अध्यक्ष नितीन पठारे, सुरेखाताई सांगळे, गणेश गायकवाड, राहुल देशमुख,  पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे, नंदू भंडारे, गणेश सातकर, योगेश साळुंखे, नवनाथ कापसे, विशाल बोठे आदी उपस्थित होते.  केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की नगर जिल्ह्यात कोपर्डी सारखी घटना घडून 5 वर्षे पूर्ण होऊन देखील आरोपींना अद्याप पर्यंत शिक्षा झालेले नाही गोरगरीब जनतेचा अजूनही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ज्या दिवशी सर्वसामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास उडेल त्यादिवशी जनता कायदा हातात घेऊन नराधमांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मराठा आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका दुटपी वाटत आहे तसेच शेतकर्‍यांना सातबारा कोरा करण्याचा आमिष या सत्ताधार्‍यांनी जनतेला दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्रात शांत बसणार नाही मराठा आरक्षण संदर्भात छावा येणार्‍या 9 ऑगस्ट क्रांती दिना पासून राज्यात आक्रमक भूमिका घेऊन दंडुके हातात घेऊन मोर्चे काढणार असल्याचे म्हणाले व संघटनेची ग्रामीण भागामध्ये ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू असून वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी छावा संघटना नेहमी प्रयत्नशील आहे अनेक सामाजिक विषय हाताळत असताना छावा संघटना वंचितांना आधार बनून कार्य करीत आहे. सत्काराला उत्तर देत नूतन नगर तालुका अध्यक्ष किरण फटांगरे म्हणाले की पुढील वाटचाल जोमाने करणार व युवकांच्या माध्यमातून छावा संघटना मजबूत करणार असल्याचा निर्धार यावेळी फटांगरे यांनी व्यक्त करून निवडीबद्दल त्यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment