संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे होणार प्रस्थान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे होणार प्रस्थान

 संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे होणार प्रस्थान

कोरोनाचे नियम पाळून सर्व कार्यक्रम; मंदिर प्रशासनाची माहिती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाच्या श्री संत निळोबाराय पालखी सोहळा 4 जुलै 2021 रोजी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गत वर्षी प्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीतच पार पडणार आहे.
रविवार दि. 4 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत प्रस्थान सोहळा असुन दि. 4 जुलै 2021 रोजी निळोबारायांचे वंशज पहाटे 5 ते 6 अभिषेक पुजा करतील सकाळी 9 ते 10 संत निळोबारायांच्या रहात्या वाड्यात ( विठ्ठल रूखमिनी मंदिरात ) जगतगुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने महापुजा होईल.  10 ते 10:30 वा पंचपदी होईल 10:30 ते 11 पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीतील विण्यांचे पुजन होईल .
सकाळी 11 :00 वाजता पारनेर तालुक्यांचे  आमदार निलेश लंके तहसीलदार ज्योति देवरे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व गट विकास अधिकारी  किशोर माने यांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून रहात्या वाड्यातुन समाधी मंदीराकडे प्रस्थान होईल. दि. 19 जुलै 2021 पर्यंत वारीतील सर्व विधीवत कार्यक्रम मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडतील.
दि.19 जुलै रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत प्रस्तानाचे किर्तन समाधी मुख्य मंदिरात पार पडेल. सकाळी 10 ते 11 वेळेत पादुकांचे विधीवत पंढरपूर कडे प्रस्थांन केले जाईल याचवेळेस महापुजा केली जाईल या महापुजेसाठी 19 जुलै रोजी मा.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले  मा.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या शुभहस्ते महापुजा पार पडेल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभुषन अण्णासाहेब हजारे व  आमदार निलेश लंके उपस्थित असतील व त्यांच्या हस्ते पंढरपूर कडे जाणार्‍या शासनाच्या बसला नारळ वाढवून प्रस्थान केले जाईल.
सर्व संस्थान व सेवा मंडळाचे पदाधिकारी व सोहळ्यातील सर्व दिंड्यांचे प्रतीनीधी हजर राहतील गावातील सरपंच, उपसरपंच  सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी  उपस्थित असणार आहेत. सकाळी 11:30 वाजता प्रस्थान सोहळा पार पडेल.
त्यानंतर 19 जुलै 2021 ते 22 जुलै 2021 पर्यंत संत निळोबाराय ( पादुका ) व वारकरी पंढरपूर येथे राहतील व 22 जुलै रोजी पंढरपूर वरून परतीचा प्रवास होईल. 22 जुलै ते 24 जुलै पर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहील व गुरु पौर्णिमेचा सोहळा काल्याच्या किर्तनाचे 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत होईल व 12 ते 1 महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सोहळ्याची सांगता होईल.
दिं .4 जुलै ते 24 जुलै पर्यंत वारीचे सर्व नित्याचे कार्यक्रम विणेकरी ह.भ.प.पांडुरंगबुवा रासकर व सोहळा प्रमुख ह.भ.प. गोपाळबुवा मकाशीर यांच्या मार्गदर्शना नुसार पार पडतील.  हे सर्व होणारे विधीवत कार्यक्रम हे  कोरोनाचे नियम होणार आहेत.

No comments:

Post a Comment