वासुंद्याचे युवक अनिकेत झावरे व ऋषिकेश दाते ठरले देवदूत ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 1, 2021

वासुंद्याचे युवक अनिकेत झावरे व ऋषिकेश दाते ठरले देवदूत !

 वासुंद्याचे युवक अनिकेत झावरे व ऋषिकेश दाते ठरले देवदूत !

हरिचंद्रगड येथे बुडणार्‍या तरुणाला जीव धोक्यात घालून वाचवलेनगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर भटकंती व ट्रेकिंग करण्यासाठी पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील काही युवक मंगळवारी गेले असता या हरिश्चंद्रगडाच्या कुंडात एक अनोळखी मुलगा गटांगळ्या खात असताना या तरुणांना दिसला. युवकाला बुडताना पहिल्यावर अनिकेत झावरे याने काही ही विचार न करता त्याला वाचवायला आपला जीव धोक्यात घालून उडी मारली. त्याच्यापाठोपाठ ऋषिकेश दाते याने ही लगेच उड़ी मारली आणि त्या दोघांनी त्या अनोळखी युवकाचे प्राण वाचवले. त्यामुळे पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील या धाडसी युवकांनी या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल अकोले तालुक्यात यांचे कौतुक होत आहे.
हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगला गेलेले असताना गडावरील कुंडात एका अनोळखी युवकाला बूडताना वाचविले. त्यांच्या सोबत वासुंदे गावचे -किरण झोंबाड़े, अकाश दाते, अमोल वाकचौरे, तुषार झावरे, युवराज उमाप, शुभम ठुबे, वैभव बुचडे, प्रज्योत चेमटे, अभिजीत चेमटे, शुभम जगदाळे हे उपस्थित होते.
वासुंदेतील या तरुणांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर, युवा नेते नीलेश गायकर, माजी सरपंच प्रताप पाटील, जोगेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष जालिंदर वाबळे, अमोल उगले, ग्रामपंचायत सदस्य पोपट साळूंखे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, सुनील टोपले यांनी विशेष कौतुक केले आहेे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here