लॉकडाऊनमध्ये बदलला उस्थळ दुमाला गावाच्या जि.प.शाळेचा चेहरामोहरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

लॉकडाऊनमध्ये बदलला उस्थळ दुमाला गावाच्या जि.प.शाळेचा चेहरामोहरा

 लॉकडाऊनमध्ये बदलला उस्थळ दुमाला गावाच्या जि.प.शाळेचा चेहरामोहरा

डिजिटल शिक्षणाबरोबरच वेबसाइटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेची भरारी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांनी शेतकर्‍यांच्या मुलांना बाळ वयातच शिक्षण व संस्कारांचे धडे गिरवले त्याच शिदोरीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आप-आपल्या क्षेत्रा मध्ये कामाचा ठसा उमटविला आहे.यामध्ये गुरुजणांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षकांनी काळानुसार बदल करीत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल प्रणालीचा मार्ग अवलंबला पाहिजे हेच धोरण डोळ्यासमोर ठेऊन नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावांतील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी पुढाकार घेऊन आधुनिक पद्धतीने शिक्षणा साठी डिजिटल प्रणाली सुरू केली याच बरोबर शाळेने स्वतः ची वेबसाईट तयार करून शाळेची सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे, या लॉकडाउनच्या काळामध्ये सर्व गावकर्‍यांना एकत्रित करून शाळेची रंगरंगोटी करून घेतली त्यावर शिक्षणाचे विविध उपक्रम त्या भिंतींवर रेखाटले आहेत.कोरोनाच्या काळामध्ये एका बाजूस जनजीवन विस्कळीत झाले असतांना गावकर्‍यांच्या सहयोगातून मुलांचे शिक्षण न थांबविता गुगल मिटद्वारे ऑनलाईन अध्यापन केले जात आहे .कोरोनाच्या संकटाला संधी मानुन शिक्षणासाठी गावकर्‍यांच्या सकारात्मक एकजूटीतुन गतिमान झालेला उपक्रम शिक्षणासाठी पारदर्शक ठरेल तसेच शाळेबाबत सर्व काही माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे अशी माहिती नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बापू कांडेकर यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना 1913 मध्ये झाली असून शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहे यामध्ये 129 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन अध्यापना बरोबरच शाळा डिजिटल बनली असून शाळेने स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे. शाळेच्या उपक्रमाची माहिती थथथ.नझडउकजजङणडढक-ङऊणच-ङ-.उज.खछ या वेबसाईटवर उपलब्ध असून शाळेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शालेय जनरल रजिस्टर,सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन अभिलेखे ,शालेय पोषण आहार योजना ही सर्व माहितीचे संगणकीकरण करून उपलब्ध करण्यात आले आहे.
याच बरोबर गृहभेटी,प्रत्यक्ष गट अध्यापन यांच्या माध्यमातून सर्व मुलांचे शिक्षण सुरू आहे तसेच बौध्दिक विकासासाठी प्रश्नमंजुषा,चैन ड्रील असे उपक्रम राबवण्यात येत आहेत याच बरोबर मुलांना सामाजिक उपक्रमाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी वृक्षारोपण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,जयंती-उत्सव आदी सर्व उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात अशी माहिती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. नरेंद्र भदगले यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुरेखा मेहेत्रे, सुनिता बेरड, शिल्पा कारंजकर, मनिषा क्षेत्रे हया अधिक परिश्रम घेत आहेत.
या सर्व उपक्रम राबविण्यासाठी सरपंच बाबासाहेब कोतकर,उपसरपंच राजेंद्र भदगले , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र भदगले ,भाऊसाहेब जाधव,भाऊसाहेब पवार, कैलास पिटेकर, दादासाहेब वाघ, प्रशांत सुकाळकर, संदिप निक्रड आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
याबाबत शाळेतील विविध उपक्रमाची पाहणी करून गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे,अधिक्षिका हेमलता गलांडे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड, विद्यादेवी सुंबे,माजी सरपंच बाळासाहेब भदगले, पत्रकार जयकिसन वाघ ,डॉ. राधाकृष्ण सुकाळकर,अविनाश सानप,अशोक आठरे,सेवा संस्थेचे सुभाषराव गायकवाड,राजेंद्र गायकवाड,जयसिंह गायकवाड,पोलिस पाटील प्रसाद गायकवाड, राहूल सानप, यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment