गाडी पासिंग करताना माजी सैनिकाची फसवणूक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

गाडी पासिंग करताना माजी सैनिकाची फसवणूक.

 गाडी पासिंग करताना माजी सैनिकाची फसवणूक.

आरटीओ कार्यालयाच्या आवारात एजंटचा सुळसुळाट...

92 हजारांस गंडविले,एजंट फरार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आरटीओ कार्यालयाच्या आवारात एजंटचा सुळसुळाट झाला असून या आवारात अनेक दिवसांपासून आरटीओ संबंधित कार्यासाठी येणार्‍या नागरिकांना फसवणुकीस सामोरे जावे लागत आहे. केडगाव भुषणनगर येथील एका माजी सैनिकास आरटीओ कार्यालयाच्या आवारातील एका तोतया एजंटने गाडी पासिंग करुन देण्याच्या बहाण्याने 92 हजारांना गंडविले. आज 13 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडुरंग नाना साठे (वय 41, धंदा. रिटायर, रा. सावली सोसायटी, केडगाव, भूषणनगर, अहमदनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. साठे यांनी फिर्यादीत म्हटले की, मी सेवानिवृत्त होण्याअगोदर अयोध्या (जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश) या ठिकाणी नेमणुकीस असताना 9.10.2020 रोजी टाटा अल्ट्रोज ही पांढर्या रंगांची गाडी खरेदी केलेली आहे. गाडी खरेदी केल्यानंतर मला ही गाडी महाराष्ट्र येथील अहमदनगरमध्ये पासिंग करावयाची असल्याने, मी तिचा रोड टॅक्स भरलेला नव्हता. तसेच मला  टेम्पररी पासिंग नंबर (यूपी-42/पीसी 0216) मिळाला होता. मी  1.10.2020 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर बुकींग केलेली गाडी ताब्यात घेऊन अहमदनगर मध्ये 11.10.2021 रोजी आलो. त्यानंतर गाडी पासिंग करावयाची असल्याने आरटीओ ऑफीस चांदणी चौक येथे 30.11.2020 रोजी गेलो. गाडी पासिंग करणबाबत चौकशी करत असताना मला महेश अर्जुन खेडकर हा एजंट भेटला.
पासिंग करण्यासाठी 85000 रुपये खर्च सांगितल्याने, मी महेश खेडकरला पंच्याऐशी हजार रुपये रक्कम असलेला स्टेट बँक ऑफ इंडिया दिल्लीगेट शाखेचा चेक दिला. मी वेळोवेळी महेश खेडकर याचेकडे फोन करून गाडी पासिंगबाबत विचारणा करीत होतो. परंतु खेडकर हा वेळ मारुन नेत होता. मी खेडकर यास फोन करुन विचारले असता, तो मला म्हणाला की, गाडीचे आरसी बुक पोष्टाने घरी येईल. त्यानंतर मी पुन्हा ऑनलाईन चेक केले. गाडीचा नंबर दिसत नसल्याने मी महेश खेडकर यास फोन केला असता, तो फोन उचलत नसल्याने मला संशय आला. मी त्याचे घरी जावून पाहणी केली असता तो घर सोडून कोठेतरी गेला असल्याचे घरातील लोकांनी सांगितले.
आरटीओ ऑफीस मध्ये जावून गाडीच्या पासिंगबाबत चौकशी केली असता, मला अर्जुन खेडकर याने दिलेला नंबर हा बनावट असल्याचे समजले. तसेच इतर लोकांकडुन समजले की, महेश अर्जुन खेडकर हा व्यक्ती फसवणुक करतो, असे समजले आहे. त्या मुळे पासिंगसाठी महेश अर्जुन खेडकर (रा.संत वामनभाऊ नगर, पाथर्डी, जि अ.नगर) याने चेकद्वारे व फोन पे द्वारे एकुण रक्कम 92000 रुपये घेवून बनावट नंबर देवून  फसवणुक केल्या प्रकरनी साठे यांच्या फिर्यादीवरुन कलम 420 अन्वये कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment