काष्टी सेवा संस्थेला फसवणूकप्रकरणी सहाय्यक निबंधकांची नोटीस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

काष्टी सेवा संस्थेला फसवणूकप्रकरणी सहाय्यक निबंधकांची नोटीस

 काष्टी सेवा संस्थेला फसवणूकप्रकरणी सहाय्यक निबंधकांची नोटीस

नातेवाईकांना केले नियमबाह्य कर्ज वितरण

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  राज्यात  नावलौकिक असलेल्या व महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याकडून अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या संचालक मंडळ, तसेच सचिव,व्यवस्थापक,व बक अधिकार्‍यांना कलम 83 च्या चौकशीनंतर कलम 146  प्रमाणे कारवाई का करु नये म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी नोटीस बजावले असल्याचे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राकेश कैलास पाचपुते व प्रा. सुनिल माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
काष्टी सेवा संस्थेमध्ये मागील पाच वर्षात कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटप करणे मध्ये संस्थेच्या 128 सभासदांना 2 कोटी 21 लाख 78 हजार 500 रुपये इतक्या रक्कमेचे संस्थेने नियमबाह्य कर्जवाटप केलेले चौकशीत उघड झाले आहे. यामध्ये संस्थेचे आजी माजी पदाधिकारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य कर्ज वितरण झाले आहे. अगदी दैनंदिन  कामकाजावर ज्याचे बारकाईने लक्ष असते ते भगवानराव यांच्या  कुटुंबातील पत्नी,मुलगी,,पुतण्या, भावजई यांनाही नियमबाह्य कर्ज दिल्याचे धक्कादायक बाब  चौकशीत समोर आली आहे. 128 पैकी 95 सभासदांच्या नावाने कर्जमाफी साठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले.त्यामध्ये ज्या सभासदांना नियमबाह्य कर्जे दिली त्यांना कर्जमाफी मिळवून देत शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.चौकशी अहवालामध्ये नमुद केलेल्या निष्कर्षानुसार सर्वच मुद्द्यवर संस्था संचालक मंडळ,सचिव,व्यवस्थापक, हे दोषी असल्याचे  सहकार खात्याकडून सुचित करण्यात येऊन 1996 पासून 2020 पर्यत चोवीस वर्षे एकाच जागेवर सचिव म्हणून काम पहाणारा एस.बी.बुलाखे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी गैरकारभाराबध्दल निलंबित करुण चौकशी अधिकारी  म्हणून जामखेड येथील देवीदास घोडेचोर याची नियुक्ती केल्याचे सांगितले. राकेश पाचपुते व सुनिल माने यांनी सहकार खात्याकडे चौकशीची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन कलम 83 नुसार चौकशी  पूर्ण करुण चौकशी अहवाल सादर केला आहे. यामुळे संस्थेचा गैरकारभार समोर आला आहे.कलम146  प्रमाणे दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सहकार खात्याने सुरु केली असल्याची माहिती पाचपुते व माने यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.यावेळी माजी अध्यक्ष  कैलासराव पाचपुते, अड.विठ्ठलराव काकडे,माजी उपसभापती वैभव पाचपुते,प्रकाश शिवराम पाचपुते, दत्तात्रय गेणबा पाचपुते, मधूकर क्षीरसागर आरपीआयचे  बंडू जगताप,काशिनाथ काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here