श्रीगोंदा तालुक्याच्या पुर्व सरहद्दीवरील ग्रामस्थांशी अनुराधा नागवडेंनी साधला संवाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 16, 2021

श्रीगोंदा तालुक्याच्या पुर्व सरहद्दीवरील ग्रामस्थांशी अनुराधा नागवडेंनी साधला संवाद

 श्रीगोंदा तालुक्याच्या पुर्व सरहद्दीवरील ग्रामस्थांशी अनुराधा नागवडेंनी साधला संवाद

नागवडेंनी जपला कोरडवाहू भागाशी ओलावा...!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  श्रीगोंदा तालुक्याचा पश्चिम भाग हा घोड-विसापुर-कुकडी पाण्याच्या ओलिताखाली येणारा बागायत परीसर म्हणुन ओळखला जातो,तसा तालुक्याचा पुर्व भाग हा जिरायत पट्टा व दुष्काळग्रस्त समजला जातो.तालुक्याचे राजकारण देखील जिरायत-बागायत प्रश्नांवर लढवले जाते.जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी तालुक्याच्या पुर्व सरहद्दीवरील थिटेसांगवी,घोगरगाव,बांगर्डे गावातील ग्रामस्थांशी बुधवार दि.14 रोजी संवाद साधला.
त्यामुळे त्यांनी कोरडवाहू भागाशी ओलावा जपल्याची भावना येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.यावेळी थिटेसांगवीचे माजी सरपंच पुर्व भागातील सीना धरणग्रस्तांचे प्रतिनीधी पांडाभाऊ उगले यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान स्थानिक प्रश्नांविषयी चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने ऊस प्रश्न व सोसायटी कर्ज वाटप,रुईखेल-बांगर्डे परीसरातील बंधार्याच्या पाणी गळती संदर्भात नागरीकांनी समस्या मांडल्या,ते सर्व प्रश्न सोडवण्याचा व पाठपुरावा करणार असल्याचे सांगत संबंधित अधिकार्यांना तशा सुचना दिल्या,यावेळी त्यांनी थिटेसांगवी येथील प्रगतशील शेतकरी दिवंगत रामदास मुरलीधर बागल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
याप्रसंगी नागवडे कारखान्याच्या संचालिका रेखाताई लकडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय महांडुळे,सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे,विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अदिल शेख,माजी सरपंच नानाभाऊ बागल,टकले भाऊसाहेब,प्रशांत वाळके, अशोक तापकीर,तुकाराम वाळके,दत्तात्रय रामदास बागल,संगिता उगले,सत्यम उगले,महेश उगले,वैभव उगले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here