राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांना हेल्मेट व मास्क’चे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांना हेल्मेट व मास्क’चे वाटप

 राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांना हेल्मेट व मास्क’चे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील पत्रकारांना स्वरक्षणासाठी मोफत हेल्मेट, मास्क व डायरीचे न्यु आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहामधे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे शुभहस्ते व राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वृक्षाला मान्यवरांचे हस्ते पाणी घालत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.यावेळी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे,पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर सर,कार्यक्रमाचे निमंत्रक व पारनेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता गाडगेसर आदींनी विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी दोन वर्ष केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणुन,प्रदेश व जिल्ह्याच्या संघटनेने दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा सचिवपदी पत्र देवुन नियुक्ती करण्यात आली. तसेच,राळेगणसिध्दी येथील पत्रकार एकनाथ भालेकर यांची पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख भाऊसाहेब वाघचौरे, कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, पत्रकार सदानंद सोनावळे, संतोष सोबले,रामदास नरड, बाबाजी वाघमारे, ज्ञानेश्वर लोंढे, अविनाश भामरे,  शिरीष शेलार, गंगाधर धावडे, एकनाथ भालेकर, आनंदा भूकन, ज्ञानेश्वर लोंढे, सुधिर पठारे, संदिप  गाडे, विजय रासकर, सागर आतकर, राम तांबे, संजय मोरे, निलेश जाधव, भगवान श्रीमंदीलकर, चंद्रकांत कदम, किरण थोरात, किरण शिंदे,अभिजीत कपाळे, निलेश शेंडगे, संपत कपाळे, पोपट पायमोडे, संपत वैरागर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here