पदाधिकारी व ग्रामस्थ यांचा समन्वय साधल्याने गावचा विकास ः राणीताई लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

पदाधिकारी व ग्रामस्थ यांचा समन्वय साधल्याने गावचा विकास ः राणीताई लंके

 पदाधिकारी व ग्रामस्थ यांचा समन्वय साधल्याने गावचा विकास ः राणीताई लंके

वाघुंडे बुद्रुक गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः विद्यमान सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचा समन्वय साधल्यानेच गावचा खरा विकास होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी केले.
पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक येथे  राणीताई  लंके यांच्या जनसुविधा योजनेअंतर्गत वाघुंडे बुद्रुक येथील नगर पुणे महामार्ग ते गावठाण रस्ता कॉक्रिटीकरण या कामासाठी 19 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करून सदर कामाचे भूमीपुजन राणीताई लंके यांच्या हस्ते करण्यात आले़. यावेळी त्या बोलत होत्या.तसेच यावेळी विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास वाघुंडे बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच संदीप वाघमारे, विद्यमान उपसरपंच सौ.लताबाई अनिल रासकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष गाडीलकर, दत्ता दिवटे, सुनिता रासकर, छाया गाडीलकर, ग्रामसेविका श्रीमती केदार.आर.के तसेच पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, लोकनियुक्त सरपंच तथा आत्मा कमिटीचे अध्यक्ष  राहुल झावरे, फिरोज हवालदार, वाघुंडे खुर्द गावचे माजी सरपंच संदीप मगर, युवा उद्योजक किशोर यादव, संदीप चौधरी, ठेकेदार सत्यम निमसे, अमोल कांबळे, वाघुंडे बुद्रुक निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश रासकर, माजी सरपंच राजेंद्र रासकर, माजी सरपंच दादाभाऊ रासकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम गाडीलकर, संतोष झरेकर, रामदास रासकर, माजी उपसरपंच रामचंद्र गायकवाड, वैभव रासकर, संजय वाघमारे, भीमराव वाघमारे, निखिल गाडीलकर, महेश पठारे, गणेश रासकर, अविनाश रासकर, दिनेश बोडरे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होत

No comments:

Post a Comment