कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत आदेश- महापौर रोहिणीताई शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 7, 2021

कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत आदेश- महापौर रोहिणीताई शेंडगे

 कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत आदेश- महापौर रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये चालू असलेल्या व प्रलंबित कामाबाबत नगरसेविका व अधिकारी यांची बैठक संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सदर बैठकीमध्ये शहरातील साफ सफाई बाबत कचरा वाहतुकीसाठी सर्व वाहने व्यवस्थीत आहेत का याबाबत माहिती घेतली. शिवाजी नगर भागामध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहते याबाबत शहर अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हायवे क्रास करून तीन ते चार दिवसामध्ये पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण करू. बांधकाम विभागाचे जवळपास 125 कामाचे टेंडर प्रक्रियेमध्ये आहेत ती टेंडर प्रक्रिया येत्या आठवडयामध्ये पूर्ण होईल. स्वच्छता निरिक्षक  व मुकादम यांना प्रभागामध्ये फिरण्यास सांगून साफ सफाई केल्यानंतर रजिस्टरवर नागरिकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे, अशा सुचना दिल्या. कचरा डेपोमधील चालू असलेल्या कामाची माहिती घेतली. सध्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे औषध फवारणी करणे, फॉगिंग मशिन चांगल्या ठेवणे.
शहरातील व उपनगरातील रस्त्याची पॅचिंग करणेची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. विद्युत विभागाकडून एलईडी लाईट नविन बसविणेचा पोलचा सर्व्हे चालू असून 6 ते 7 हजार पोल आतापर्यत सर्व्हे झाला आहे. प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येक सदस्यांना दुरूस्तीसाठी साहित्य देण्यात येईल. पाणी पुरवठा विभागाकडून अमृत पाणी पुरवठा योजना तसेच भुयारी गटर योजना या कामाची माहिती घेतली. यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी कामाबाबत तात्काळ आदेश दिले.
कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ.सतिष राजूरकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, जवळपास 40 ते  50 महिला रूग्ण हॉस्पीटलमध्ये अडमिट असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आल्याने दवाखान्यामध्ये कर्मचारी वर्ग अपुरा आहे. लहान मुलांना अडमिट करून घेता येते परंतु ऑपरेशन थिएटर नसल्यामुळे इतरत्र अडमिट करावे लागते. इमारत फार जुनी झाली आहे. यावेळी महिला सदस्य यांनी आपआपल्या प्रभागातील समस्यांबाबत मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांचेबरोबर चर्चा केली. मा.महापौर यांनी अधिकारी यांना सुचना दिल्या.
यावेळी नगरसेविका उपसभापती म.बा.क.समिती सुवर्णाताई गेणाप्पा, पुष्पाताई बोरूडे, श्रीमती मंगलताई लोखंडे, श्रीमती शांताबाई शिंदे, श्रीमती सुनिताताई कोतकर, कमलताई सप्रे, संध्याताई पवार, रूपालीताई वारे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे, सहाय्यक आयुक्त सिनारे, नगररचनाकार चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्याधिकारी डॉ. सतिष राजूरकर, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, अभियंता कल्याण बल्लाळ, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, नाना गोसावी, अंबादास सोनवणे, स्टोअर विभाग प्रमुख ए.जी जाधव, मार्केट विभाग प्रमुख वाळेकर, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे आदी उपस्थित होते. महिला नगरसेविका यांनी महापौर शेडगे यांचे आभार मानले. महिला नगरसेविकांना या मध्ये बैठकीत बोलण्याची संधी मिळाली व आपले प्रभागाचे समस्या मांडता आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here