गावाच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य सेवकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले ः डोंगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

गावाच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य सेवकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले ः डोंगरे

 गावाच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य सेवकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले ः डोंगरे

नगरी दवंडी/प्रतिनिधी



अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक निलेश हराळ यांची बदली झाली असता स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, समुदय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ह.भ.प. रामदास महाराज शेंडे, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, अनिल डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, गणेश कापसे आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवक निलेश हराळ यांनी निमगाव वाघात सहा वर्षे सेवा केली. त्यांची नुकतीच वाळवणे (ता. पारनेर) येथे बदली झाली असता त्यांचा गावात सत्कार करण्यात आला. पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावाच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य सेवकांनी महत्त्वपुर्ण योगदान दिले. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी उत्तम कामगिरी केल्याने कोरोनाचे संक्रमण टळण्यास मदत झाली. आरोग्य सेवकाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना निलेश हराळ यांनी गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने चांगल्या पध्दतीने कार्य करता आले. गावात काम करताना प्रेमाची वागणुक मिळाली. ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा केलेल्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment