आय लव्ह नगरच्या रांगोळी स्पर्धेत दिव्या वर्मा प्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

आय लव्ह नगरच्या रांगोळी स्पर्धेत दिव्या वर्मा प्रथम

 आय लव्ह नगरच्या रांगोळी स्पर्धेत दिव्या वर्मा प्रथम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून आय लव्ह नगरच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.दिव्या संतोष वर्मा हीचे प्रथम क्रमांक मिळविला. नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. युवतींबरोबरच युवकांनीही यात भाग घेऊन आपले कौशल्य दाखविले.
कु.दिव्या हीने तयार केलेल्या रांगोळीतून शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची मुर्ती, नगरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला, आशिया खंडातील सर्वात मोठे टँक म्युझियम, चाँदबिबी महाल, माळीवाडा व दिल्लीगेट वेस, आनंदधाम आदि वास्तू रांगोळीच्या माध्यमातून रेखाटल्या आहेत. त्यातून नगरच्या ऐतिहासिक वास्तूंची रेखाटन करुन नगरच्या वैभवशाली ऐतिहासिक वास्तूंची साक्ष देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या 8 बाय 10 स्क्वे.फूट अशा भव्य स्वरुपातील ही रांगोळी सर्वांचे आकर्षक ठरली. त्यामुळेच या रांगोळीस प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळाले आहे.
कु.दिव्या हीने यापूर्वीही अनेक कला स्पर्धेत सहभागी होऊन विविध पारितोषिके पटाकाविली आहे. आय लव्ह नगरच्या या रांगोळी स्पर्धेत मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment