प्रामाणिकपणे काम करणार्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

प्रामाणिकपणे काम करणार्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही

 प्रामाणिकपणे काम करणार्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही

आगामी निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार- दीपक निकाळजे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पक्षात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना संधी देणार असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी नगर दौर्‍यामध्ये पत्रकारांशी बोलताना पत्रकार परिषदेत केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा पक्ष पुनर्बांधणी व पक्ष बळकटी करण्यासाठी नुकताच नगर जिल्ह्यात दौरा झाला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना निकाळजे बोलत होते.
यावेळी प्रथम मुंबई येथे दरड कोसळून मृत  झालेल्याना व बापा शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बोलताना निकाळजे म्हटले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना 1990 साली झाली या पक्षात गेली बावीस वर्षापासून काम करत असून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारसरणीत पक्ष बळकटीचे काम करीत आहे. सन 2018 मध्ये आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आपली निवड झाली. यापूर्वी पक्षामध्ये फक्त स्वार्थ आला होता. यावेळी आपण भविष्यात राज्य विधान सभेत पद घेणार नाही असे स्पष्ट सांगितले.  नगर मधील पक्षाचे काम प्रमाणिकपणे करणार्‍या जास्तीत जास्त लोकांना तिकिट देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार आहे. असे निकाळजे यांनी यावेळी म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी 26 जुलै 2019 ला स्वतःचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले.) स्थापन केला मात्र पक्ष स्थापन करताना त्यांनी नोंदणी चुकीच्या पद्धतीने केली असा आरोप करीत निकाळजे यांनी म्हटले आहे की आठवले यांच्या पक्षाचा आपल्या पक्षावर काहीही परिणाम होत नाही. आठवले यांनी तरुण वर्गाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाकडे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे तरुण वर्ग संघटित होत आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यात चांगले स्ट्राँग करणार आहे.आपल्या पक्षात स्वार्थ होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेत आहोत. अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांना न्याय मिळावून देणार आहोत हा आपला निर्णय आहे. परंतु पक्षाचा निर्णय तितकाच महत्त्वाचा आहे असे निकाळजे यांनी यावेळी सांगितले.यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, मुंबई युवक अध्यक्ष अक्षय निकाळजे, युवक महाराष्ट्र अध्यक्ष अमित वर्मा, राजाभाऊ कटारनवरे, मंगेश जाधव, दादासाहेब ओहोळ, अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उतर चे अध्यक्ष शशी दारोळे अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे, अहमदनगर उत्तर युवा जिल्हाध्यक्ष रॉकीभाऊ लोंढे, उत्तर महाराष्ट्र सचिव महेश सुरडकर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजन ब्राह्मणे, हरिभाऊ अल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment