नगरसेविका मीनाताई चोपडांचा “कोरोना योद्धा” सन्मानाने गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

नगरसेविका मीनाताई चोपडांचा “कोरोना योद्धा” सन्मानाने गौरव

 नगरसेविका मीनाताई चोपडांचा “कोरोना योद्धा” सन्मानाने गौरव

आय लव्ह नगर कडून..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरसेविका मीनाताई चोपडा.. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारं शहरातील कर्तृत्ववान महिला नेतृत्व. अशा कार्यरत महिला नागरिकांच्या सन्मान करणारे शहरातील मोठे व्यासपीठ म्हणजे आय लव्ह नगर. शहराच्या विकासाचे ध्येय समोर ठेवणार्‍या या संघटनेने मीनाताईंचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मान केला. कोरोना काळात “नगरसेविका” म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणार्‍या मीनाताईंचा गौरव म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असेच म्हणावे लागेल.
नगरसेविका मीनाताई चोपडा या प्रभागातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी तत्पर असतात. नागरिकांचे महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करतात. यासाठी त्यांना आ.संग्राम जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते. करोनाच्या संकट काळात त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया यांच्या सहकार्यातून नगर शहरात फिरता दवाखाना सुरू करून रूग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. करोनाचा कहर सुरु असताना अँटीजेन, आरटीपीसीआर चाचणी केंद्रांची व्यवस्था, रूग्णांचे विलीगीकरण, त्यांना बेड मिळवून देणे याकामीही त्यांनी योगदान दिले. करोना लसीकरणात सुसूत्रता आणून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण कसे होईल यादृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. यात साधूसाध्वीजींच्या लसीकरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आय लव्ह नगरने त्यांना करोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केले आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here