महापौर रोहिणीताई शेंडगेंचे आवाहन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

महापौर रोहिणीताई शेंडगेंचे आवाहन..

 महापौर रोहिणीताई शेंडगेंचे आवाहन..

नागरिकांनी आवश्यकता असेलच तर घराबाहेर पडावे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी बाजारात, रस्त्यावर गर्दी केल्यास कोरोना प्रादुर्भाव वाढणार आहे. आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञानी व्यक्त केली. त्या दृष्टिने मनपाच्या वतीने उपाय योजना करण्यासाठी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे, यांनी काल दुपारी 4-00 वा. बैठक घेतली.
याप्रसंगी महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की पेशंटची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे. मनपाच्या वतीने तिसर्‍या लाटेच्या दृष्टिने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या. सध्या मनपाचे दोन कोवीड सेंटर सुरू असून आणखी आवश्यकता भासल्या दोन दिवसात कोवीड सेंटर उभारण्याच्या दृष्टिने नियोजन करण्यात आले आहे.  नागरिक विनाकारण बाजारात, रस्त्यावर गर्दी करित आहेत. यामुळे पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. असेही त्या यावेळी म्हणाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लस घेतली पाहिजे.  अहमदनगर शहरासाठी जास्तीत जास्त लस पुरवठा होण्यासाठी मा.शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने 65 वर्षा पुढील आजारी  नागरिक ज्यांना चालता येत नाही, बेड रेस्ट आहे अशा नागरिकांना घरोघर जावून लस  देण्याच्या सुचना दिल्या. येणार्रयस संभाव्य कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत नागरिकांना कोरोनाचा त्रास जाणवल्यास मनपाच्या कोवीड सेंटर मध्ये दाखल व्हावे. जेणे करून आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही. ऑक्सीजन प्लॅट बाबत माहिती घेतली असता येत्या 8 ते 10 दिवसात लिक्वीड ऑक्सीजन प्लॅन्टचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सीजनची आवश्यकता भासल्यास ऑक्सीजन उपलब्ध होईल त्यादृष्टिने कार्यवाही सुरू आहे. तसेच सावेडी उपनगर भागासाठी विद्युत दाहिनी सुध्दा लवकरात लवकर कार्यान्वीत होणार आहे. गोर गरिब व गरजू नागरिकांसाठी सर्व सोयीयुक्त दवाखाना असणे आवश्यक आहे. यादृष्टिने मनपाच्या माध्यमातून 500 बेडचे हॉस्पीटल सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका टाळण्यासाठी सामाजिक अंतर, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी सांगितले की, विनायक नगर, बुरूडगांव रोड, या भागातील नागरिकांची घरोघर जावून कोवीडची तपासणी करावी. मनपाच्या लसीकरण केंद्रसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात यावी रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी जास्तीत जास्त टेस्टींग करण्याच्या सुचना केल्या. मागील कोरोनाच्या काळात ऑक्सीजन बेड रूग्णांना वेळेवर मिळत नव्हते. संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता असल्यामुळे ऑक्सीजन बेड जास्तीत जास्त उपलब्ध होण्याच्या दृष्टिने प्रशासनाने कार्यवाही करावी. यावेळी मा.आयुक्त श्री.शंकर गोरे  यांनी वैद्यकिय आरोग्याधिकारी यांना सुचना केल्या की, प्रत्येक लसीकरण केंद्रावर तपासणी करून नागरिकांना लस देण्यात येते की नाही याची खात्री करावी. येणार्‍या संभाव्य लाटेबाबत मी स्वत: शहरात व उपनगरात फिरून माहिती घेत आहे. ज्या भागामध्ये पेशंट वाढले आहे. त्या ठिकाणी कॅन्टामेंट झोन करण्याच्या सुचना दिल्या. जास्तीत जास्त टेस्टींग करण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या. नागरिकांनी विनाकारण फिरू नये. असे आवाहन केलं. यावेळी आयुक्त शंकर गोरे,उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक अनिल शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संभाजी कदम, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ.सतिष राजूरकर, डॉ.श्रीमती नलिनी थोरात, डॉ.गणेश मोहळकर, डॉ.श्रीमती एस.व्ही.चेलवा, डॉ. माधुरी गाडे, डॉ.आरती डापसे, डॉ.  कविता माने, डॉ. आएशा शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here