नवे शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मुलांसोबत संवाद आवश्यक ः शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

नवे शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मुलांसोबत संवाद आवश्यक ः शिंदे

 नवे शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मुलांसोबत संवाद आवश्यक ः शिंदे

क्राय संस्था मुंबई यांच्या वतीने आयोजित नवे शैक्षणिक धोरण कार्यशाळा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी मुलांसोबत सुसंवाद असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत असताना राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे यांनी व्यक्त केले. क्राय संस्था मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. आयोजित नवे शैक्षणिक धोरण कार्यशाळेचे उद्घाटक जनरल मॅनेजर पश्चिम विभाग क्राय इंडियाचे कुमार निलेदु यांच्या हस्ते झाले त्यांनी नवे शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाच्या वैष्वीकरनासाठीची रणनीती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपीयु चे अहमदनगर प्रतिनिधी वैभव देशमुख माध्यमिक विस्ताराधिकारी राजेंद्र पवार गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार संचालक बॉस्को केंद्र अहमदनगर फादर जॉर्ज क्षेत्रीय प्रशिक्षक काय बीपी सूर्यवंशी हे उपस्थित होते.                              
जनरल मॅनेजर पश्चिम विभाग क्राय इंडियाचे कुमार निलेदु, क्राय महाराष्ट्र राज्य प्रमुख सौमीता दास, प्रोग्राम मॅनेजर क्राय राम चंदर, प्रमुख मार्गदर्शक तथा आरटीई सदस्य मंदार शिंदे यांची ऑनलाइन पद्धतीने प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना शिंदे म्हणाले की मुलांना कोणते व कसे शिक्षण हवे आहे यासाठी त्यांच्यासोबत संवाद होणे आवश्यक आहे केंद्र सरकारने अंमलबजावणी पूर्वी राज्यस्तरीय बाल संवाद कार्यक्रमाचे आयोजन करावे वंचित समाजातील मुले व मुलींना समान पातळीवर शिक्षण मिळण्यासाठी मुलापर्यंत शाळा गेली पाहिजे किंवा मुलांना शाळेपर्यंत येणार्‍या सर्व अडथळे कमी करायला हवी तेव्हाच शिक्षण धोरण परिणाम कारक राहील असे ते म्हणाले पुढे राज्य प्रमुख महाराष्ट्र क्राय इंडियाचे सौमीता दास यांनी कार्यशाळा आयोजनाची दिशा व प्रक्रिया यासंबंधी सविस्तर माहिती दिली आणि आरटीई पुणेचे मेंबर मंदार शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये व शिक्षणाच्या वैश्वीकरनातील आव्हाने याबाबत सविस्तर मांडणी केली शिक्षणाची गरज व त्यासमोरील आव्हाने यावर राजेंद्र काळे यांनी सांगितले तर डिजिटल शिक्षणाची अपरिहार्यता उपलब्ध आणि त्यासमोरील आव्हाने यावर सारिका देसाई यांनी सांगितले तर 18 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी अनिवार्य शिक्षणाची आवश्यकता व त्यासमोरील आव्हाने मुलींचे व स्थलांतरित पालकाचे शिक्षण सुनिता भोसले यांनी सांगितले तर स्नेहल राणे यांनी शैक्षणिक विविध धोरणे अंमलबजावणी आणि त्यासमोरील आव्हाने ऑनलाईन शिक्षण व परीक्षा याविषयी गुड्डू चर्चेतून आलेल्या मुद्द्यांची माहिती मांडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. पी. सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वंचित विकास संस्था अहमदनगर अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक समितीतील सुदीप पडवळ नंदा साळवे महेश सूर्यवंशी शिवदर्शन सदाकाळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment