माहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

माहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव

 माहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील घोटवी येथील गट नं.83 मधील मुरूम उत्खनन प्रकरणी घोटवी येथील खंडू बारगूजे या इसमाने वनविभागाच्या श्रीगोंदा कार्यालयात माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकून उत्खनन विषयी माहिती मागितली असता खंडू बारगूजे यांना वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांनी दि.12 रोजी घोटवी येथे जाऊन दबाव टाकत मुरूम उत्खनन प्रकरणी काहीही कारवाई होणार नाही, आमच्यावर राजकीय दबाव असून आम्हाला याबाबत अनेकांचे फोन आलेले आहेत या प्रकरणी जुजबी कारवाई होणार असल्याचे सांगत टाकलेला माहितीचा अधिकार अर्ज माघारी घेण्यास सांगितले.तसेच हे प्रकरण मिटुन घेण्यास सांगितल्याने खंडू बारगुजे यानी उपवनसंरक्षक अहमदनगर यांच्याकडे दि.13 जुलै रोजी तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment