शिवसेनेच्यावतीने राहाता तालुक्यातून शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 14, 2021

शिवसेनेच्यावतीने राहाता तालुक्यातून शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ..!

 शिवसेनेच्यावतीने राहाता तालुक्यातून शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ..!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय ना.उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज अहमदनगर जिल्हा शिवसेनेच्यावतीने राहाता तालुक्यातून शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान जलसंधारण मंत्री मा.ना.शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते व मोलाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार आदरणीय सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेब नाना खेवरे, माजी जिल्हाप्रमुख आदरणीय सुहास बापू वहाडणे,  शिवसेनेचे नेते आदरणीय कमलाकर कोते पाटील, माजी नगराध्यक्ष आदरणीय धनंजय गाडेकर, उपनगराध्यक्ष मा.राजेंद्र पठारे, नगरसेवक मा.सागर लूटे, जिल्हा संघटक मा.विजय काळे, माजी उपजिल्हाप्रमुख मा.नानासाहेब बावके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.अनिल बांगरे, जेष्ठ नेते मा.अशोक थोरे, माजी नगरसेवक मा.राजेंद्र अग्रवाल, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंदराव सिनगर, भारतीय कामगार सेनेचे डी.डी.पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा.संजय आप्पा शिंदे, उपतालुकाप्रमुख भास्करराव मोटकर, राहाता शहराचे शहरप्रमुख मा.गणेश सोमवंशी, शिर्डी शहराचे शहरप्रमुख मा.सचिन कोते, युवासेनेचे प्रताप निर्मळ, अमोल गायके, रविंद्र सोनवणे, महेश कुलकर्णी, सुभाष उपाध्ये, भागवत लांडगे, अनिल पवार, जयराम कांदळकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून यापुढे अभियानांतर्गत गावागावात शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here