मनसेेचे सौरभ हाडवळे आणि सामाजिक कार्यकर्ते योहान गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 14, 2021

मनसेेचे सौरभ हाडवळे आणि सामाजिक कार्यकर्ते योहान गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 मनसेेचे सौरभ हाडवळे आणि सामाजिक कार्यकर्ते योहान गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत मनसे विद्यार्थी सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष सौरभ हाडवळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोरोना काळात शिर्डी शहरामध्ये नागरिकांसाठी 500 औषधी कीट, 300 वाफेचे मशीन, पोलिसांना फेसशिल्डच वाटप केले असून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, चित्रकला स्पर्धा यासारखी प्रोत्साहन देणारे उपक्रम घेतले आहेत. शिर्डी शहर काँग्रेसमध्ये सौरभ आणि योहान यांचा योग्य सन्मान करून त्यांना योग्य जबाबदारी दिली जातील असे सचिन चौगुले म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here