लोकसंख्या शिक्षण काळाची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 10, 2021

लोकसंख्या शिक्षण काळाची गरज

 लोकसंख्या शिक्षण काळाची गरज


ज 11 जुलै, आजचा दिवस जगभर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. 11 जुलै 1987 रोजी जगात पाच अब्जावे बालक जन्माला आलं तेंव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. 1987 ते 2011 म्हणजे अवघ्या चोवीस वर्षात जगाची लोकसंख्या दोन अब्जानी वाढून ती सात कोटींपर्यंत पोहचली याचाच अर्थ जगाची लोकसंख्या तुफान वेगाने वाढत आहे. भारतात तर लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. आज भारताची लोकसंख्या 140 कोटींच्या आसपास आहे. देश स्वातंत्र्य झाला तेंव्हा आपली लोकसंख्या तीस कोटी होती याचा अर्थ मागील सत्तर वर्षात आपल्या देशातील लोकसंख्या 110 कोटींनी वाढली. लोकसंख्येत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे पण लवकरच भारत चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहचेल असे जाणकारांचे मत आहे. अर्थात ही काही भूषणावह बाब नाही. देशाच्या सर्व समस्यांचे मूळ हे वाढत्या लोकसंख्येतच आहे. झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे देशात अन्न, वस्त्र, निवारा, रोगराई आणि दारिद्रय असे अनेक प्रश्न उदभवू  लागले आहेत. विशेष म्हणजे देशाच्या प्रगतीत वाढती लोकसंख्या ही मोठा अडसर ठरत आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून विकासालाही खीळ बसत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणेही सरकारला शक्य होत नाही. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावरून पुरेसे प्रयत्नही केले जात आहेत. पण समाजातून अजूनही  त्या प्रयत्नांना म्हणावी तशी साथ मिळत नाही. कुटुंब  नियोजनाची मोहीम सरकारी पातळीवर प्रभावीपणे राबवली जात आहे ही दिलासा देणारी बाब असली तरी  मुलगा व्हावा या हट्टापायी तीन ते चार अपत्यांना जन्म देणारे महाभागही समाजात आहेत. या आणि अशा लोकांमुळेच ही मोहीम वेग धरत नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर नव्या पिडीमध्ये लोकसंख्येविषयी योग्य दृष्टिकोन आणि जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी  नव्या पीडिला लोकसंख्या शिक्षण दिले पाहिजे. अवघ्या 24 वर्षात जगाची लोकसंख्या पाच अब्जानी वाढली तर देशाची  लोकसंख्या सत्तर वर्षात 110 कोटींनी वाढली या वेगाने जर लोकसंख्या वाढत राहिली तर  लोकसंख्येचा हा भार वसुंधरा पेलू शकणार नाही त्याचा परिणाम एकूणच मानवी जीवनावर काय होईल हे नव्या पीडिला समजावून सांगावे लागेल. देशातील लोकसंख्या जर नियंत्रणात आली नाही तर सर्वानाच अडचणींचा सामना करावा लागेल. आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न आहोत. हे स्वप्न साकार करायचे असेल तर वाढत्या लोकसंख्येला आळा घालावाच लागेल हे नवीन पीडिला पटवून द्यावे लागेल. वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे दुष्परिणाम, निर्माण होणार्‍या समस्या याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करायला हवे. लोकसंख्या शिक्षण अप्रत्यक्ष सामाजिक शिक्षण आहे त्यामुळे केवळ तरुणांनाच नव्हे तर समाजालाही या शिक्षणाची गरज आहे. लोकसंख्या शिक्षण ही काळाची गरज आहे. लोकसंख्या वाढ रोखायची असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल आणि देशाला महासत्ता बनवायचे असेल तर लोकसंख्या शिक्षणाला पर्याय नाही.
- श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे. मो. 9922546295

No comments:

Post a Comment