पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची राज्यभर सायकल रॅली- सत्यजीत तांबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची राज्यभर सायकल रॅली- सत्यजीत तांबे

 पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची राज्यभर सायकल रॅली- सत्यजीत तांबे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारने सामान्य जनतेवर पेट्रोल डिझेल दरवाढ करून मोठा बोजा लादला आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 16 जुलै ते 18 जुलै 21 या काळात संपूर्ण राज्यात सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सत्यजीत तांबे म्हणाले की, देशात कोरोना ने थैमान घातले आहे मात्र मोदी सरकार प्रसिद्धी व फोटोसेशन मध्ये व्यस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानासुद्धा पेट्रोल व डिझेल चे भाव शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे सर्वत्र महागाई वाढली असून याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पेट्रोल व डिझेलवर सरकारने 40 टक्के कर लादणे ऐवजी सरळ 18% जीएसटी लावून नऊ टक्के कर राज्य सरकारला द्यावा व नऊ टक्के कर केंद्र सरकारला ठेवावा. यामुळे नक्कीच पेट्रोल व डिझेलची भाववाढ मोठ्या फरकाने कमी होणार आहे.
तातडीने भाव वाढ मागे घ्यावी या करता संपूर्ण राज्यात एक कोटी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरीही केंद्र सरकार कोणतीही कार्यवाही करत नाही. याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा व तालुका च्या ठिकाणी 16 जुलै ते 18 जुलै 21 या काळामध्ये सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये त्या विभागातील पदाधिकारी या सायकल रॅलीत सहभागी होणार आहेत. देशातील सामान्य माणूस जगवण्यासाठी देशात खासदार राहुल गांधी व राज्यात महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेस अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. यामध्ये सर्वसामान्य जनतेने सहभागी होत मोदी सरकारच्या अन्यायी जुलमी धोरणाविरुद्ध बुलंद आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment