भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस; नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 21, 2021

भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस; नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा.

 भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस; नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा.

डोंगरांवरून धबधबे कोसळू लागले...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भंडारदरा परिसरात सर्वत्र डोंगरांवरून धबधबे कोसळताना दिसू लागले आहेत. काही ठिकाणी भात आवणीच्या कामाला वेग आला आहे. कृष्णावती नदीला पूर आला आहे. वाकी प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. रंधा धबधबा कोसळू लागला आहे. कोदणी वीज प्रकल्पही सुरू झाला आहे. सायंकाळी भंडारदरा धरणात 3028 दशलक्ष घनफूट साठा झाला होता. दरम्यान, निळवंडे धरणातून विसर्ग सायंकाळी बंद करण्यात आला आहे. मुळा पाणलोटात हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई, कुमशेत परिसरात संततधार सुरू आहे. अंबित पिंपळगाव खांड पाठोपाठ कोथले धरण ओव्हर फ्लो’ झाले आहे. मुळा नदीतून सकाळी पाच हजार449 क्यूसेक वेगाने पाणी वाहतेय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाडा आणि नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. रतनवाडी आणि घाटघर परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. पर्यटकांसाठी हा पाऊस चांगला असला तरी जीवावर बेतणारा आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत रतनवाडी येथे साडेसहा आणि घाटघर येथे पाच इंच पाऊस झाला आहे. त्यामुळे आज सकाळी सहापर्यंतच्या चोवीस तासांत धरणात 429 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने जमा झाले. त्यामुळे भंडारदरा जलाशय 50 टक्के तर कोथळा 100 टक्के भरले आहे. परिसरात आवणीच काम जोरात सुरू झाली आहेत.
लघु पाटबंधारे तलाव (कोथळे, ता. अकोले जि. अहमदनगर) रात्री 9 वाजता पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पाची साठवण क्षमता 182 दलघफू आहे. सदर प्रकल्प स्थानिक कोथळे नाल्यावर बांधला आहे. हा विसर्ग पुढे मुळा नदीमध्ये प्रवाहीत होत आहे. फोफसंडी (ता. अकोले) संततधारेमुळे शिवारातील शेतीत पाणीच पाणी झाले आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटर) : भंडारदरा 117, धरणांतीला साठा 5590(दशलक्ष घनफूट)जलाशय 50टक्के भरले: घाटघर 125, रतनवाडी 155, पांजरे 122, वाकी, निळवंडे 95 आढळा 11, अकोले 3, कोतूळ 14 भंडारदरा 5589, निळवंडे 1600 दशलक्ष घनफूट पाण्याची अवाक 100 दशलक्ष घनफूट इतकी आहे.रतनवाडीत साडेसहासहा इंच, घाटघरला 5 इंच पाऊस पडला. देव हंडी शिरपूजे, वाकी जलाशय भरले जाईल, असे जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment