वरिष्ठ महिला अधिकार्‍याचा तरुणाकडून विनयभंग. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 21, 2021

वरिष्ठ महिला अधिकार्‍याचा तरुणाकडून विनयभंग.

 वरिष्ठ महिला अधिकार्‍याचा तरुणाकडून विनयभंग.

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता.

शेवगाव - वरिष्ठ महिला अधिकार्‍याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकार्‍याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वरिष्ठ महिला अधिकार्‍याचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विशाल विजयकुमार बलदवा असं आरोपी तरुणाचं नाव आहे.  महिला अधिकार्‍याचे विचित्र पोस्टर छापून सामाजिक आणि कौटुंबिक बदनामी केल्याचा आरोप आहे. तसेच महिला अधिकार्‍याचे पती आणि मुलीबद्दल फोनवर अश्लील आणि अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचाही दावा केला जात आहे. संबंधित महिला अधिकार्‍याच्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला जात होता. विशाल बलद वावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here