स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’

 स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’

वरपिता विजय चौधरींची प्रतिक्रिया


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आजकाल धकाधकीच्या जीवनात व कोरोनासारख्या परिस्थितीत पालकांना स्थळ शोधणं फार अवघड झालं आहे, अशावेळी स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून मराठी सोयरीक संस्था आहे, अशी प्रतिक्रिया नेवासा येथील वरपिता पोस्टमास्तर श्री विजय चौधरी यांनी दिली आहे. अवघ्या पाच वर्षात 2000 लग्न या संस्थेकडून जमलेली आहेत. त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे ’मराठी सोयरीकला ’ उभ्या महाराष्ट्रातून मागणी वाढली आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नुकतेच मराठी व मराठा सोयरीक संस्थेमार्फत 18 जुलै 2021 रोजी चार जणांचे विवाह पार पडले. नेवासाफाटा येथील चौधरी, भिंगार येथील दुराफे, निंबोडी येथील शेटे व प्रवरासंगम -नेवासा येथील शिंदे यांचे विवाह मराठी सोयरीक मधून जमले व  पार पडले. आज-काल लग्नासाठी मुली ही मिळत नाहीत. अनेक पालकांना फसवेगिरी चा अनुभव आलेला आहे, अशा कठीण परिस्थितीत मराठा व मराठी सोयरीक ग्रुपचा फार मोठा आधार वधू-वर पालकांना मिळाला आहे. सर्व जाती-धर्माच्या पालकांना घर बसल्या मोबाईल वर अनेक स्थळे बघायला मिळत आहेत. तसेच ऑनलाईन वधुवर मेळाव्यामुळे समोरासमोर वधु वर बघायला मिळतात. विशेष म्हणजे लग्न जमल्यानंतर ही संस्था कुणाकडेही एक रुपयाही मागत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील पालकांनी मराठी सोयरीकला एक नंबर पसंती दर्शविली आहे. बायोडाटा वर पालकांचे नंबर लपवत नाहीत. त्यामुळे पालक डायरेक्ट एकमेकांना संपर्क करतात व लवकर लग्न जमतात अशीही प्रतिक्रिया एका वधूचे पालक वकील संदीप काळे यांनी दिली आहे. सर्व जातिधर्मांच्या स्थळासाठी 70 20 28 12 82 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे. मराठी सोयरीक संस्थेत फेसबुक पेज, इंस्टाग्राम, युट्युब चॅनेल, गुगल अकाऊंट, वेबसाईट, मोबाईल प, टेलिग्राम इत्यादी सोशल मीडियाच्या सर्व प्रकारांचा वापर केला जातो. फेसबुक पेजच्या माध्यमातून लवकरच पालकांसाठी व्याख्यानमाला सुरू करणार असल्याची माहिती प्रसिद्ध योगशिक्षक, ङ  ढ कंपनीतील पॅनल प्रमुख मधुकर निकम, विजय चौधरी, संदीप काळे, जयश्री कुटे, अंजली पठारे, रुपाली जाधव, हर्षदा काळे, नकुल कुटे, दानवे सर, भास्कर नरसाळे, प्रा.योगेश कोतकर, प्रवीण बेलदार यांनी दिली आहे. तसेच कमी शिकलेल्या मुलींचे स्थळे सुचवावेत असेही आवाहन मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment