गुंडेगाव शाळेची घंटा वाजली, विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

गुंडेगाव शाळेची घंटा वाजली, विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली

 गुंडेगाव शाळेची घंटा वाजली, विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून (19 जुलै) गुंडेगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल हायस्कूलचे  इयत्ता 8ते 10 पर्यंत शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून शाळेच्या खोल्या  निर्जंतुकीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात 175 पैकी  90 विद्यार्थी उपस्थितीत होते,  कोरोनामुळे पालकांमध्ये अद्याप संभ्रम असल्याने शाळेत पाठविण्यासाठी बहुतांश पालकांनी नकार दर्शविला आहे.
शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलाची तपासणी करूनच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे . शाळेच्या मुख्य दरवाजावर सॅनिटायझर, थर्मल गन ठेवण्यात आलेआहे. तसेच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणार्‍या पालकांचीही तपासणी करण्यात येतआहे .कोरोनाच्या काळानंतर  शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत असली तरी येत्या काही दिवसात शंभर टक्के उपस्थिती दिसेल, असे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका पी.डी .नेहूल मॅडम यांनी सांगितले. तसेच शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. शाळेचा परिसर आणि वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरणही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गावातील ग्राम सुरक्षा समिती ने प्रत्याक्षात पाहणी केली असून यावेळी शिक्षक परशुराम साबळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, सतिश चौधरी, संतोष सकट, पत्रकार संजय भापकर, विद्यार्थी पालक प्रमोद पवार, संतोष जाधव, रामकृष्ण कुताळ अदि उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment