स्टेशन रोड सुभद्रानगर मुलभुत सुविधा द्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

स्टेशन रोड सुभद्रानगर मुलभुत सुविधा द्या

 स्टेशन रोड सुभद्रानगर मुलभुत सुविधा द्या

शिव राष्ट्र सेनेचे आयुक्तांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः दौंड रोड येथील स्टेशन रोड, सुभद्रानगर परिससरातील नागरी समस्यांसाठी ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन व स्ट्रीट लाईट समस्याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांना शिव राष्ट्र सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, बाबासाहेब करपे, अनिल शेकटकर, शंभु नवसुपे, आदेश बचाटे, राहूल तांबे, संदिप नन्नवरे, अनिल दळवी यावेळी उपस्थित होते.
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दौंड रस्ता येथील सुभद्रानगर या भागात  नवीन लोकवस्ती वाढत असून, त्या प्रमाणात मनपाच्यावतीने मुलभुत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत.  त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  येथील वसाहतीत ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, रस्ता व स्ट्रीट लाईटची सुविधा लवकरात लवकर मनपाच्यावतीने पुरविण्यात यावी.  अन्यथा शिव राष्ट्र पक्षाच्यावतीने महानगरपालिकेच्या कार्यालयात आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
याप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी अक्षय कांबळे यांनी आयुक्तांना या भागातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला. आयुक्तांनही याबाबत तातडीने कार्यवाही करुन या नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here