सिद्धेश्वरवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

सिद्धेश्वरवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन..!

 सभापती काशिनाथ दाते सर यांच्यामुळे विकासकामांना गती : डॉ. श्रीकांत पठारे

सिद्धेश्वरवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन..!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : 

सिध्देश्वरवाडी ता. पारनेर येथे ३०५४ अंतर्गत रामा-६८, गडदवाडी, सिद्धेश्वरवाडी, नरोडेदारा, ते रामा-६७ रस्ता (ग्रामा -९२) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे सा.क्र. ७/० ते ८/० - १५ लक्ष, रुपयांचे भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथजी  दाते सर यांचे शुभहस्ते व माजी जि. प. सदस्य आजाद ठुबे, शिवसेना ता. प्रमुख विकास रोहोकले, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे,युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना काशिनाथ दाते सर म्हणाले की  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना मला तालुक्यात आज अनेक विकास कामे करता येत आहेत. त्यामुळे तालुक्याचा राहिलेला विकासाचा  आलेख भरून निघत आहे. तसेच यावेळी बोलताना पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले की काशिनाथ दाते सर यांच्यामुळे तालुक्यात विकासकामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. 

यावेळी सरपंच युवराज गुंजाळ, उपसरपंच विजय नरड, ग्राम. सदस्य योगेश नरड, राहुल नरोडे, सचिव सुभाष कावरे, सुनील चत्तर, अनिल नरोडे, राहुल कावरे, संदीप चत्तर, नवनाथ कावरे, कानिफ चत्तर, दादाभाऊ चत्तर, जालिंदर नरोडे ,अनिल नरवडे, अक्षय नरवडे, शेखर चत्तर ,किसन नरोडे ,अशोक नरोडे, अक्षय चत्तर, सुरेश चत्तर , सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अहिरे, शाखा अभियंता जगदाळे रावसाहेब, कामाचे ठेकेदार देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment