शिर्डी येथे दिव्यांगांच्या स्वावलंबन युडीआयडी कार्ड ऑनलाइन ओळखपत्र शिबीर संपन्न...! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

शिर्डी येथे दिव्यांगांच्या स्वावलंबन युडीआयडी कार्ड ऑनलाइन ओळखपत्र शिबीर संपन्न...!

 शिर्डी येथे दिव्यांगांच्या स्वावलंबन युडीआयडी कार्ड ऑनलाइन ओळखपत्र शिबीर संपन्न...!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहराच्या वतीने सेवा उपक्रम म्हणून दिव्यांग बांधवांचे युडीआयडी कार्ड (युनिक विकलांगता कार्ड) ऑनलाइन नोंदणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिरा मध्ये 105 दिव्यांगांनी भेट दिली यापैकी 89 दिव्यांगाचे आवश्यक कागदपत्र पूर्ण असल्याने ऑनलाइन युडीआयडी नोंदणी करण्यात आली. यावेळी देशाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने विकलांगता हि अतिशय गंभीर समस्या असल्यामुळे दिव्यांग बांधवांचे दैनंदिन जीवन सोयीस्कर करण्यासाठी व दिव्यांगांसाठी असणार्‍या केंद्र व राज्यसरकरच्या सर्व योजना आपल्या राज्यात तसेच परराज्यात देखिल लाभ घेता यावा या उद्देशाने स्वावलंबन युडीआयडी योजना सुरू केली आहे असे योगेश गोंदकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक पवार, भाजपा शिरडी शहर अध्यक्ष श्री.सचिन शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री.किरण बोराडे, सक्षम दिव्यांग संघटनेचे राहाता तालुका संयोजक श्री.सचिन पोटे, उत्तरनगर जिल्हा सचिव गोरक्षनाथ काटे उपस्थित होते. याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष हा आपल्या नेत्याचा वाढदिवस देखिल समाजच हित डोळ्यासमोर ठेवूनच साजरा करतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष हा विक्रांत पाटील यांचा संघर्षमयी प्रवास कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. बालपणापासून सामाजिक कार्यात सक्रिय असतांना सर्वप्रथम पनवेल विद्यार्थी मोर्चाची जबाबदारी तालुका व व रायगड जिल्हा विध्यार्थी मोर्च्यांची जबाबदारी यशस्वी पार पाडून सलग दोन वेळेस प्रदेश सरचिटणीस जबाबदारी देखील पार पाडली व आज ते प्रदेशाध्यक्ष आहे व पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर देखील राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात या एक वर्षात राज्यसरकांच्या विरोधात सर्वधिक आंदोलने असून मराठा व ओबीसी आरक्षणासाठी राज्यात तीव्र त्यांनी आंदोलन केली आहेत. यावेळी अशोक पवार यांनी युवा मोर्चाने वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवासाठी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. आभार प्रदर्शन लखन बेलदार यांनी केले. यावेळी ओबीसी मोर्चाचे स्वानंद रासने, नरेश सुराणा, सोमराज कावळे, प्रसाद शेलार, सोमराज कावळे, सतिष गायकवाड, अक्षय मुळे, सागर जाधव, विशाल पवार, राजू बलसाने, मंगेश खांबेकार, सागर भोईर, शुभम सुराणा, गणेश सोनवणे, महेश सुपेकर, साहिल बेलदार, सागर रोकडे, दिपक सदफळ, ऋषिकेश कोडीलकर, बाबासाहेब खरात, राहुल घुले, नितीन घुले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment