शाळेत मिळालेली शिकवण, संस्कार, शिक्षण हे भावी वाटचालीचा पाया असतो ः ईश्वर सुराणा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

शाळेत मिळालेली शिकवण, संस्कार, शिक्षण हे भावी वाटचालीचा पाया असतो ः ईश्वर सुराणा

 शाळेत मिळालेली शिकवण, संस्कार, शिक्षण हे भावी वाटचालीचा पाया असतो ः ईश्वर सुराणा

‘स्नेह 75’च्यावतीने गुरूपौर्णिमेनिमित्त फिरोदिया शाळेतील शिक्षकांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रत्येकाच्या जीवनात अनेक गुरू असतात.परंतू शाळेत असलेले शिक्षक हे कायमस्वरूपी लक्षात रहातात. कारण त्यांनी दिलेले शिकवण,संस्कार,शिक्षण हे भावी वाटचालीचा पाया असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. असे प्रतिपादन स्नेह 75 चे ईश्वर सुराणा यांनी केले.
स्नेह 75 च्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त भाउसाहेब फिरोदिया शाळेचे शिक्षक सौ. रजनी रसाळ , एस. आर. जोशी,  प्रकाश कुलकर्णी ,  सुभाष कुलकर्णी,  विजय कुलकर्णी,  अनंत दसरे , प्रभाकर वाघ  यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी विश्वनाथ पोंदे, अजित चाबुकस्वार, ईश्वर सुराणा, किशोर रेणावीकर, डॉ. प्रविण रानडे, किशोर रेणावीकर, अभय गांधी, दिनेश गुगळे, रजनी बगाडे,  रजनी भंडारे, जया लवार, विनोद सोळंकी  आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आज आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण आहे की, ज्या विदयार्थ्याना आम्ही घडवले त्यांच्या हस्ते सन्मान झाला. आम्ही घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.
प्रास्ताविक विश्वनाथ पोंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. प्रविण रानडे यांनी केले.अजित चाबुकस्वार यांनी सर्व शिक्षकांचा परीचय करून दिला आभार किशोर रेणावीकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment