गुरुपौर्णिमा व वाढदिवसानिमित्त पारनेरला वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

गुरुपौर्णिमा व वाढदिवसानिमित्त पारनेरला वृक्षारोपण

 गुरुपौर्णिमा व वाढदिवसानिमित्त पारनेरला वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  गुरु हे आपणास मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवितात त्याच प्रमाणे वृक्ष हे ही आपले गुरुच असून तेही आपल्याला आयुष्यात परोपकार करण्याचे मार्गदर्शन करतात असे प्रतिपादन सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतिफ राजे यांनी आनंद मेडिकल फौंडेशनचे संचालक फहाद सादिक राजे यांचा वाढदिवस व गुरुपौर्णिमेनिमित्त पारनेर येथील जिजामाता विद्यालयात वृक्षारोपण व शिक्षकांना रोपे भेट देताना केले.
यावेळी मुख्याध्यापक संतोष ठाणगे, शिक्षक सोपान गवते, राजेंद्र चत्तर, श्रीम नंदा चेडे, पप्पू कावरे, शशिकांत भालेकर, गणेश पठारे, संजय शिंदे, गोपी काळभोर, योगेश बुगे, जुनेद शेख, तुषार औटी, शितल रोकडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतीफ राजे म्हणाले की  निसर्ग हा माणसाचा खरा गुरु आहे. कारण माणूस निसर्गापासून अनेक गोष्टी शिकत असतो. मात्र हा निसर्गच आज संकटात सापडला असून त्याला वाचविण्याची जबाबदारी आता माणसाची असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्याच प्रमाणे दैनंदिन जीवन हे पर्यावरणपुरक असले पाहिजे.
यावेळी माझी वसुंधरा- माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जिजामाता विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना सृष्टीमित परिवारातर्फे रोपे भेट देण्यात आली. यावर्षी सृष्टीमित्र लतिफ राजे यांनी माझी वसुंधरा- माझी जबाबदारी या उपकमांतर्गत पारनेर शहर व परिसरात जवळवास सहाशे रोपे मोफत भेट देऊन त्याची लागवडही केली आहे.

No comments:

Post a Comment