श्रीराम ग्रोटेक इंडस्ट्रीज या भव्य कृषी मॉलचे दिमाखात उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

श्रीराम ग्रोटेक इंडस्ट्रीज या भव्य कृषी मॉलचे दिमाखात उद्घाटन

 श्रीराम ग्रोटेक इंडस्ट्रीज या भव्य कृषी मॉलचे दिमाखात उद्घाटन



नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कृषी क्षेत्रात एवढा मोठा मॉल जो बारामतीमध्ये सुद्धा नाही तो आपण कर्जत मध्ये उभा केला यातून नेटके बंधू ची दूरदृष्टी कळते व्हीजन कळते म्हणून कर्जत तालुक्यात होणार्‍या एम आय डी मध्ये तुम्ही पहिला प्लांट घ्याल व आपल्या नवं निर्मितीचे प्रोडक्शनचे स्वप्न पूर्ण कराल अशी आशा आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केली कर्जत येथे नेटके बंधू यांनी उभारलेल्या श्रीराम ग्रोटेक इंडस्ट्रीज या भव्य कृषी मॉलचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कर्जत येथील नगर रोडवर नेटके बंधू यांनी श्रीराम ग्रोटेक इंडस्ट्रीज हा भव्य कृषी मॉल उभारला असून त्याचे उद्घाटन आ रोहित शर्मा पवार यांच्या हस्ते झाले, सदर कार्यक्रम माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता, हभप दयानंद महाराज यांच्या भाषेत हे दोन ग्रह एकत्र येणार असल्याने त्याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते, मात्र माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी वेळेत येऊन नेटके कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या तर ते गेल्यानन्तर काही वेळाने आ. रोहित पवार हे आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप दयानंद महाराज कोरेगावकर हे होते, यावेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, गंगादादा बोरुडे, हभप अमृतराव खराडे गुरुजी यांनी शुभेच्छा दिल्या.
विष्णुपंत नेटके यांनी आपले अनुभव विशद करताना युवकांना व्यवसायात येण्याचा सल्ला दिला. तर हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांनी आपल्या विनोदी शैलीने सर्वाना हसवून टाकत आनंदी राहण्याचा सल्ला देताना काही चिमटे काढत तर कधी टोलेबाजी करत आ. रोहित पवार यांनी हसत हसत वेळेवर येण्याचा सल्लाही दिला.  आ रोहित पवार यांनी नेटके बंधूनी उभारलेल्या या शेती विश्वाचे कौतुक करताना कर्जत तालुक्यात विकास होत असून यासाठी अशा विकासाची दृष्टी असलेल्या व्यक्तीची गरज असून नक्कीच याच्या कार्यात त्यांना कुटुंबायाची साथ मिळत असल्याचे कौतुक केले.
यावेळी  सुनील शेलार, काकासाहेब तापकीर, ऍड सुधीर भापकर, विशाल म्हेत्रे, सचिन कुलथे, बापूसाहेब नेटके, आदी सह अनेक जण जखमी उपस्थित होते.
यावेळी कर्जत तालुक्यातील विविध अधिकारी पदाधिकारी व सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे रंगनाथ दगडू नेटके, निवृत्ती दगडू नेटके, विष्णुपंत नेटके, बाळासाहेब नेटके, नवनाथ नेटके, नितीन नेटके, डॉक्टर ऋषिकेश नेटके व श्रीराम नेटके यांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment