भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर.

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर.

मनपा विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय होणार..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (दि 23) नगर शहराच्या दौर्‍यावर असून ते नगर शहर, दक्षिण, उत्तर जिल्ह्यातील भाजपचा संघटनात्मक आढावा घेणार असून नगर मनपा विरोधी पक्ष नेता कोण असणार याबाबत नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. पाटील हे उद्या दिवसभर नगर शहरात असून ते उद्या भाजपची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
नगर शहर, दक्षिण व उत्तर नगर जिल्हा भाजपचा संघटनात्मक आढावा  बूथ रचनेची माहिती घेणार आहेत.  मनपा विरोधी पक्षनेतापदाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मनपा विरोधी पक्षनेतापदासाठी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभापती मनोज कोतकर यांची नावे चर्चेत आहेत.  विरोधी पक्षनेतापदाचा निर्णय भाजप प्रदेश स्तरावरून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाटील हे आता नगर शहरात येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेताबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment