गावठी हातभट्टी कारखान्यांवर छापे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 22, 2021

गावठी हातभट्टी कारखान्यांवर छापे.

 गावठी हातभट्टी कारखान्यांवर छापे.

जिल्ह्यातील अवैध्य धंद्यांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम..
  जामखेड, सोनई, श्रीरामपूर, राहुरी, शिर्डी, नगर, कर्जत, शेवगाव, संगमनेर, पाथर्डी, भिंगार कॅम्प, एमआयडीसी, कोतवाली हद्दीतून 5 लाख 6 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दि 11 जुलै ते 21 जुलै च्या काळात विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहीम राबवून अवैद्य धंदे यांच्याविरोधात जोरदार अ‍ॅक्शन घेऊन जिल्ह्यातील 35 ठिकाणच्या गावठी हातभट्टी कारखान्यांवर छापे टाकून हातभट्टीची तयार दारू ,कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करून 36 आरोपींविरुद्ध जामखेड ,सोनई, नगर तालुका ,श्रीरामपूर शहर, राहुरी, कोतवाली, श्रीरामपूर तालुका, शिर्डी, भिंगार कॅम्प,कर्जत, शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, संगमनेर तालुका, पाथर्डी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
कर्जत पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल -24,000 रु.किं ची गावठी दारू व कच्चे रसायन आरोपी - संदीप दशरथ वायकर वय 30 वर्ष, रा. चिंचोली काळदात, कर्जत दादा उर्फ शिवाजी दिगंबर पवार रा.तरडगाव ता. कर्जत.
भिंगार कॅम्प पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 18,000 रु.किं ची गावठी दारू व कच्चे रसायन. आरोपी - इंदुबाई रामदास लोणारे वय 55 वर्षे कासार मळा कापूरवाडी शिवार नगर.
कोतवाली पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 36,500 रु.किं ची गावठी दारू, कच्चे रसायन व भट्टीची साधने. आरोपी - सचिन बाबासाहेब पवार, पवार वस्ती, लिंक रोड केडगाव. अहमदनगर.
राहुरी पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 1,67,790 रु.किं ची गावठी दारू, कच्चे रसायन, नवसागर भट्टीची साधने व रोख रक्कम, आरोपी - दीपक विष्णू गव्हाणे  वय 29 वर्ष धामोरी फाटा ता. राहुरी.
राहुरी पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 20,000रु.किं ची गावठी दारू, कच्चे रसायन व चाटू. आरोपी - राजेंद्र मच्छिंद्र गिर्‍हे ,वय 40 वर्षे धामोरी फाटा ता. राहुरी.
श्रीरामपूर शहर पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 9,000 रु.किं ची गावठी दारू व कच्चे रसायन. आरोपी- इंदुबाई विष्णू जाधव वय- 58 वर्ष देवकर वस्ती वॉर्ड नं. 7 ,श्रीरामपूर.
श्रीरामपूर शहर पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल -7,000 रु.किं ची गावठी दारू व कच्चे रसायन. आरोपी - विजूबाई तुकाराम जाधव वय- 74 वर्षे देवकर वस्ती वॉर्ड नं. 7 श्रीरामपूर.
श्रीरामपूर शहर पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल -  14000 रु.किं ची गावठी दारू व कच्चे रसायन. आरोपी - उषा प्रभाकर काळे वय -50 वर्ष कदम वस्ती गोंधवणी, श्रीरामपूर.
श्रीरामपूर शहर पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 7000 रु.किं ची गावठी दारू व कच्चे रसायन. आरोपी - शिवाजी प्रकाश कुमावत वय 30 वर्ष कदम वस्ती गोंधवणी, श्रीरामपूर.
नगर तालुका  पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 1,05,000 रु.किं ची गावठी दारू कच्चे रसायन व भट्टीची साधने. आरोपी - कानिफनाथ भिमाजी कळमकर चौगुले मळा नेप्ती शिवार ता. नगर.
नगर तालुका पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 35000 रु.किं ची गावठी दारू, कच्चे रसायन व भट्टीची साधने. आरोपी -पोपट गिरधारी गिर्‍हे खंडाळा ता नगर. गणेश पोपट गिर्‍हे .
जामखेड पो.स्टे. ः जप्त मुद्देमाल - 14000 रु.किं ची गावठी दारू कच्चे रसायन व भट्टीची साधने. आरोपी - शालन राजाराम पवार विक्री जामखेड हे दारू उत्पादन करणारे असून सतीश चंद्रभान साबळे वय 25 वर्ष सदर बाजार भिंगार, अक्षय अशोक जायगुडे वय 22 वर्षे वडुळे ता शेवगाव, सलीम बादशाह पठाण वय 66 वर्षे कोर्टाचे समोर वार्ड नंबर 1 श्रीरामपूर, पवन भगवान बनसोडे वय 22 वर्षे जुनी घास गल्ली वॉर्ड नंबर 6 श्रीरामपूर, विशाल अरुण शिंदे वय 29 वर्षे पद्मा नगर गॅस गोडाऊन जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर, शिवाजी सुदाम कराळे वय 27 वर्ष देऊळगाव सिद्धी ता नगर, भाऊसाहेब ज्ञानदेव साठे वय 42 वर्षे वाळकी ता नगर, प्रकाश सुंदरलाल पंडुरे वय30 वर्ष सोनगाव ता राहुरी, उत्तम बाबुराव सिनारे वय 52 वर्ष कोतकर वस्ती निंबळक बायपास ता नगर, अनिल रमेश म्हस्के वय 40 वर्ष गजानन कॉलनी नवनागापूर ता नगर, भगवान अशोक बळसाने रा कोल्हेवाडी ता संगमनेर, विष्णू भाऊसाहेब काळे 43 स्पर्श सांगवी ता पाथर्डी, सुखदेव ज्ञानदेव आंधळे वय पन्नास वर्षे जिरेवाडी शिवार ता पाथर्डी, देविदास श्रीपती कोतकर वय 60 वर्ष पाटील कॉलनी केडगाव अहमदनगर, सुरेश भरवाश्या भोसले वय 60 वर्ष मूळ ता श्रीगोंदा हरा शिर्डी ता राहता, योगेश भगवान शिवदे वय 40 वर्ष शिर्डी राहता, अरुण राहुल साळवे शिर्डी राहता, सचिन भोंगळ, मुनीर चांद सय्यद उदगीर गाव आऊटसाईड ता श्रीरामपूर, संजय पुंडलिक भनगडे वय 47 वर्ष उदगीर गाव आऊटसाईड ता श्रीरामपूर, हिरामण सिताराम माळी शिरसगाव ता श्रीरामपूर, हरिभाऊ संपत हसणे सोनई ता नेवासा, शिवाजी दशरथ आढाव वय 45 वर्ष चांदा नेवासा, शिव हरी राजेंद्र काळे वय 25 वर्षे भुतवडा रोड मिलींदनगर जामखेड हे दारू विक्रेते आहेत.
ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधिक्षक अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here